केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत नदी पात्राखालून जलवाहिन्या घालणार: पाऊसकर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर म्हणाले, ‘जलजीवन मिशन’ या केंद्र सरकारच्या योजनेतून या जलवाहिन्या घालण्यात येणार आहे. प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठीची ही योजना आहे. या प्रकल्पाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारला सादर करण्यात आले आहे.

पणजी: पाणीपुरवठा सुरळीत राहावा, प्रसंगी दक्षिणेतील पाणी उत्तरेत आणि उत्तरेतील पाणी दक्षिणेत आणण्यासाठी झुआरी आणि मांडवी नदी पात्राखालून जलवाहिन्या घालण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनी आज येथे दिली.

ते म्हणाले, ‘जलजीवन मिशन’ या केंद्र सरकारच्या योजनेतून या जलवाहिन्या घालण्यात येणार आहे. प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठीची ही योजना आहे. या प्रकल्पाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारला सादर करण्यात आले आहे. साळावली १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा आणखी प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अस्नोडा येथे १५ दशलक्ष तसेच साळ नदीवर १५ दशलक्ष लिटर प्रतिदिन तसेच पर्वरी येथेही याच क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पर्वरी व पणजीला जलवाहिनीने जोडले जाणार आहेत. या प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या