‘गोमन्तक’च्या सर्वेक्षणाला उत्तर गोव्यातील महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘गोमन्तक’ सर्वेक्षणDainik Gomantak

‘गोमन्तक’च्या सर्वेक्षणाला उत्तर गोव्यातील महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बहुतांश महिला स्वयंस्फूर्तीने या उपक्रमासाठी स्वत:चे योगदान देत आहेत.

म्हापसा: आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दै. ‘गोमन्तक’ने हाती घेतलेल्या ‘जनमत उत्सव’ या सर्वेक्षणाला उत्तर गोव्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे त्यापैकी बहुतांश महिला स्वयंस्फूर्तीने या उपक्रमासाठी स्वत:चे योगदान देत आहेत.

या सर्वेक्षणाच्या अंतर्ग महिलांशी सुसंवाद साधला जात असला तरी ‘गोमन्तक’चा हा उपक्रम असल्याने काही सामाजिक कार्याची आवड असलेली अभिरुचिसंपन्न पुरुषमंडळीही त्या बाबतीत सहकार्य करून जास्तीत जास्त महिलांनी सर्वेक्षणाच्या अंतर्गत स्वत:ची मते अभिव्यक्त करावीत यासाठी महिलांना प्रोत्साहित करीत आहेत. विशेष करून सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कलाकारमंडळी इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.

आजी-माजी महिला पंचाययतसदस्य, स्वयंसाहाय्य गटांच्या सदस्य, महिला मंडळांच्या सदस्यांचे या बाबतीत सक्रिय योगदान मिळत आहे. त्या संस्थांच्या पदाधिकारी अशा सर्वेक्षणाचे महत्त्व महिलांना समजावून सांगत आहेत व त्यामुळे सर्वेक्षणाला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. उत्तर गोव्यात आतापर्यंत मांद्रे मतपदारसंघातील केरी व पालये, पेडणे मतदारसंघातील कोरगाव, वझरी व विर्नोडा भागात विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी काही भागांतील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अन्य गावांत अजूनही सर्वेक्षण सुरू आहे. तसेच उत्तर गोव्यातील मये, वाळपई व प्रियोळ या मतदारसंघातही सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

‘गोमन्तक’ सर्वेक्षण
‘गोमन्तक’ सर्वेक्षणDainik Gomantak

केरी-पेडणे येथील ॐ साई स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्य.

‘गोमन्तक’ सर्वेक्षण
‘गोमन्तक’ सर्वेक्षणDainik Gomantak

केरी-पेडणे येथील लक्ष्मी स्वयंसाहाय्य गटाच्या अध्यक्ष राखी कोरखणकर.

केरी-पेडणे येथील पंचायतसदस्य रत्नाकर हरजी यांच्या पत्नी.

हळदणवाडी-मये येथील स्वदेशी स्वयंसाहाय्य गटाच्या अध्यक्ष अश्विनी दिलीप पेडणेकर व सचिव संजना संजय मयेकर.

हळदणवाडी-मये येथील संजनी स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्य.

Related Stories

No stories found.