कुठ्ठाळी मतदारसंघातही जनमन उत्सवाचे स्‍वागत

सध्या कुठ्ठाळी मतदारसंघात केळशी या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघातही जनमन उत्सवाचे स्‍वागत
Janman Utsav in kutthali constituencyDainik Gomantak

मडगाव: गोमंतकीय महिलांच्या आशा-आकांशा जाणून घेऊन त्यांच्या मनातील गोवा साकारण्याच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकत असलेले ‘गोमन्‍तक’चे जनमन उत्सव सर्वेक्षण सध्या कुठ्ठाळी मतदारसंघात सुरू आहे. सांकवाळ भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या भागातील महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या कुठ्ठाळी मतदारसंघात केळशी या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या भागातील महिलांमध्ये सर्वेक्षणाबद्दल प्रचंड कुतुहल दिसून आले. या सर्वेक्षणात महिलांना त्यांना गोवा कसा बनवायचा आहे आणि त्यात त्यांना स्थान कसे मिळू शकेल याबद्दल प्रश्न विचारले जातात. गोव्यातील एकूण तीन लाख महिलांची मते या सर्वेक्षणाद्वारे अजमावून घेतली जाणार आहेत.

Janman Utsav in kutthali constituency
शहरी आणि ग्रामीण भागांतही 'जनमन उत्सवा'चे स्‍वागत

दक्षिण गोव्यात कुंकळ्ळी मतदारसंघातही हे सर्वेक्षण सुरू आहे. चांदर, गिर्दोली आणि गुडी या भागातील महिलांनी आपली मते नोंदविली. त्‍यात नोकरदार महिला, गृहिणी आणि कष्टकरी महिलांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com