वास्‍को, कुंकळ्‍ळीत महिलांनी व्यक्त केल्या अपेक्षा

वास्को मतदारसंघात आज मांगूरहिल परिसरात सर्वेक्षण करण्यात आले.
वास्‍को, कुंकळ्‍ळीत महिलांनी व्यक्त केल्या अपेक्षा
Janman Utsav in Vasco Dainik Gomantak

मडगाव : गोव्यातील (Goa) महिलांच्या आशा-आकांशा जाणून घेऊन त्यांना मूर्त स्वरूप देण्याच्या इराद्याने ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेले जनमन उत्सव (Janman Utsav) सर्वेक्षण सध्या दक्षिण गोव्यात (South Goa) वास्को (Vasco) आणि कुंकळ्ळी (Cuncolim) या दोन मतदारसंघांत सुरू आहे. तेथील महिलांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

वास्को मतदारसंघात आज मांगूरहिल परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील महिलांनी त्यात भाग घेत आपली मते नोंदविली. मुरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मुरगाव, दाबोळी आणि जवळच्या कुठ्ठाळी मतदारसंघात हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Janman Utsav in Vasco
गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर

या सर्वेक्षणाद्वारे ‘गोमन्‍तक’ गोव्यातील तीन लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेणार आहे. त्यांच्या मतांवर आधारित पुढील कृतीसाठी आराखडा तयार केला जाईल. दरम्यान, कुंकळ्ळी मतदारसंघात आज कोंब येथे हे सर्वेक्षण करण्‍यात आले. सासष्टी तालुक्यात आतापर्यंत मडगाव, फातोर्डा, कुडतरी आणि नावेली या चार मतदारसंघांत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com