दक्षिण-उत्तर गोव्यात ‘जनमन उत्सव’ सर्व्हेक्षण सुरू

जनमत कौल : महिलांना लाभले सक्षम व्यासपिठ
दक्षिण-उत्तर गोव्यात ‘जनमन उत्सव’ सर्व्हेक्षण सुरू
Janman Utsav survey begins in South North GDainik Gomantak

मडगाव: गोमंतकीय महिलांच्या (Gomantakiy Womens) मनाचा कानोसा घेण्यासाठी ''गोमन्तक''ने हाती घेतलेल्या ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दक्षिण गोव्यात (South Goa) फातोर्डा, दाबोळी आणि पारोडा केपे या भागात सर्वेक्षण झाले.

फातोर्डा येथे उषा सरदेसाई यांच्या उन्नती या महिला स्वयंसेवा गटाच्या महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. स्वतः सरदेसाई आणि मडगाव पालिकेच्या नगरसेविका निमिशा फालेरो याही त्यात सहभागी झाल्या.

सरदेसाई यांनी ‘गोमन्तक’च्या या उपक्रमाचे स्वागत करताना गोव्यातील महिलांना याद्वारे सक्षम व्यासपीठ मिळणार, अशी आशा व्यक्त करतानाच या उपक्रमात गोमंतक बरोबर आपल्या महिला स्वयंसेवा गटही सामील होण्याची तयारी दाखवली. यावेळी गोमन्तकचे दक्षिण गोवा ब्युरो प्रमुख सुशांत कुंकळयेकर यांनी सर्व महिलांना ‘गोमन्तक’च्या या उपक्रमाची माहिती देताना त्यांच्या शंकांचे निरसनही केले. दाबोळी मतदारसंघात वाडे येथील महिला स्वयंसेवी गटातील सदस्यांनी या उपक्रमात भाग घेतला. केपे येथे पारोडा पंचायतीच्या सदस्य व अन्य महिलांनी या उपक्रमात भाग घेतला.

सर्वेक्षणासंदर्भातील फोटो वाळपई प्रियोळ व मये मतदारसंघ

1 : वाळपई येथील वंदना शर्मा.

2 : वाळपई येथील साफिया खान.

3 : वाळपई येथील महालसा स्वयंसाहाय्य गटाच्या अध्यक्ष दीपाली बेतकर.

4 : कुळकर सेल्फ हेल्प ग्रुच्या लक्ष्मी कवठणकर.

5 : प्रियोळ मतदारसंघातील वरगाव येथील एक महिला.

6 : प्रियोळ मतदारसंघातील वरगाव येथील एक महिला.

7 : प्रियोळ मतदारसंघातील वरगाव येथील एक महिला.

8 : प्रियोळ मतदारसंघातील माडापै-वरगाव भागातील महिला मंडळाच्या सदस्य.

9 : मये मतदारसंघातील श्री वाठारेश्वर सेल्फ हेल्प ग्रूपच्या अध्यक्ष वैष्णवी विजय गावकर.

10 : मये मतदारसंघातील सिद्धीविनायक सेल्फ हेल्प ग्रूपच्या अध्यक्ष संगीता चंद्रा गावकर.

11 : मये मतदारसंघातील शिरगाव येथील लक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रूपच्या सदस्य.

Related Stories

No stories found.