चिखली, दाबोळीतील महिलांचा सहभाग

जनमन उत्सव सर्वेक्षणात दाबोळी येथील महिला गटाच्या सदस्या सहभागी झाल्या.
चिखली, दाबोळीतील महिलांचा सहभाग
Janman Utsav survey in Goa Dainik Gomantak

मडगाव- महिलांच्या आकांक्षांना उमेदीचे पंख देऊन त्यांना खऱ्या अर्थाने गोव्याच्या भविष्य घडविण्याच्या भागीदार बनविण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षणाला बुधवारी सहाव्या दिवशीही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चिखली, वाडे, दाबोळी येथील महिला स्वयंसेवी गटांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन विचार मांडले. आजच्या गोव्यातील महिलांना नेमके काय हवे आहे आणि त्या स्वतःच्या पायांवर कशा उभ्या राहू शकतात या बद्दलही त्यांनी विचार व्‍यक्‍त केले.

Janman Utsav survey in Goa
जनमन उत्सव: महिलांमध्ये आरोग्य जागृती हवी

चिखली येथील टेलिफोन एक्सचेंज महिला गटाच्या अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी अगत्याने या सर्वेक्षणात सहभागी होताना, गोमंतकीय महिलांना ‘गोमन्‍तक’कडून जे प्रोत्साहन मिळत आहे ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. या सर्वेक्षणातून गोव्यातील महिलांचा फायदा होणार असल्याने या सर्वेक्षणात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असेही त्‍यांनी सांगितले.

वाडे - दाबोळी येथील शिवशक्ती महिला स्वयंसेवी गट तसेच ओमशक्ती महिला स्वयंसेवी गट यांनीही या सर्वेक्षणात भाग घेतला. गोव्याच्या महिलांचे भवितव्य घडविण्याच्या ‘गोमन्‍तक’च्या या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल आम्‍हांला आनंद झाला आहे, असे मत या महिलांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.