जेईई मेन्सच्या परीक्षेत सिद्धांत गोवेकर राज्यात पहिला

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

कोविड काळात झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत मुष्टीफंड आर्यनचा सिद्धांत गोवेकर राज्यात प्रथम आला आहे.

पणजी: कोविड काळात झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत मुष्टीफंड आर्यनचा सिद्धांत गोवेकर राज्यात प्रथम आला आहे. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने (एनटीए) ने तसे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे मुष्टीफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालयाचे ४  विद्यार्थी ९९ पर्संटायल प्राप्त केलेल्या वर्गवारीत आहेत, अशी माहिती मुष्टीफंडचे व्यवस्थापक प्रा. व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी दिली. विद्यालयाचे ४७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. प्रथम क्रमांक पटकावलेल्या सिद्धांत गोवेकर याला ९९.९१०९२४५ पर्संटायलने देशात ११०५ वा क्रमांक मिळाला आहे. गौरव अवस्थी, रुबिया शेख, आदित्य कामत हे इतर तीन विद्यार्थी ९९ पर्संटायलमध्ये आहेत. कल्याण साळकर, कविश प्रियोळकर, दिया चोडणेकर, अंताश मिश्रा, अनिश धायमोडकर, मंदार जोशी हे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरले असून विद्यालयात पहिल्या दहा क्रमांकात ते आहेत. येत्या २७ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान जेईई अॅडव्हान्सड परीक्षा होणार आहेत. 

संबंधित बातम्या