डिचोलीत जीपची दुभाजकाला धडक

गोमंतक वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

डिचोली: सुशोभीकरणाचे काम सुरु असलेल्या शहरातील बगलमार्गावरील
दुभाजकाला आज पुन्हा एकदा जीप गाडीने धडक दिल्याने दुभाजकाची
मोडतोड झाली. हा अपघात आज सायंकाळी घडला. मागील आठवड्यात
शुक्रवारी या दुभाजकाला मिनी ट्रकने धडक दिल्याने दुभाजकाची मोडतोड
झाली होती. या घटनेला आठ दिवस उलटण्याआधीच आज पुन्हा त्या
अपघाताची पुनरावृत्ती झाली. 

सायंकाळी जीए-०४-डब्ल्यू-३८५० या क्रमांकाची जीपगाडी बगलमार्गावरुन शिवाजी महाराज सर्कलच्या दिशेने जात होती. अचानक नियत्रण गेल्याने जीपगाडीची दुभाजकाला धडक बसली. सुदैवाने या अपघातात जिवीतानीसारखी घटना टळली. अपघातानंतर लागलीच क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले.

दरम्यान, कदंब बसस्थानक ते शांतादुर्गा विद्यालयपर्यंत संपूर्ण बगलमार्गावर दुतर्फा दिवसरात्र सर्रासपणे क्रेन, ट्रक आदी अवजड वाहने उभी करुन ठेवण्यात येतात. या वाहनांमुळेच बगलमार्गावर अपघात घडतात. असा नागरिकांचा दावा असून, ही समस्या त्वरित सोडवावी. अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या