जीत आरोलकर करणार आज मगोत जाहीर प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

पक्षाचा बालेकिल्ला २५ वर्षानंतर परत आणण्यासाठी या मतदार संघातून जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्याचाच  एक भाग म्हणून आपण पक्षप्रवेश करणार असल्याचे जीत यांनी यावेळी सांगितले. 

मोरजी- आज रोजी जाहीरपणे मगो पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती युवा उद्योजक जीत आरोलकर यांनी दिली. १६ रोजी मांद्रे हायस्कूल पटांगणात सायंकाळी ४ वाजता आपल्या सर्व समर्थकांसह ते जाहीर प्रवेश करणार आहेत. 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची ताकत वाढवण्यासाठी आणि ज्या मान्द्रे मतदार संघातून राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले. तो पक्षाचा बालेकिल्ला २५ वर्षानंतर परत आणण्यासाठी या मतदार संघातून जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्याचाच  एक भाग म्हणून आपण पक्षप्रवेश करणार असल्याचे जीत यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित बातम्या