गोव्यातील किनारपट्ट्यांवर वाढला 'जेलीफिश' चा धोका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

गोव्यात गेल्या दोन दिवसात 90 हून अधिक पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची घटना समोर आली आहे. या पर्यटकांवर तत्काळ प्राथमोपचार करण्यात आल्याचे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर जीवनरक्षणाचे काम करणाऱ्या 'दृष्टि' या संस्थेकडून सांगण्यात आले.

पणजी :   गोव्यात गेल्या दोन दिवसात 90 हून अधिक पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची घटना समोर आली आहे. या पर्यटकांवर तत्काळ प्राथमोपचार करण्यात आल्याचे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर जीवनरक्षणाचे काम करणाऱ्या 'दृष्टि' या संस्थेकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांत, बागा-कलंगुट किनारपट्टीवर अशा 55 हून अधिक घटना घडल्या आहेत, तर कांदोली किनारपट्टीवर 10 प्रकरणे अनुभवायास मिळाली. दक्षिण गोव्यात जेलीफिश संबंधित 25 हून अधिक घटनांमध्ये त्वरित प्रथमोपचारांची गरज होती.

जेलीफिशने दंश केल्यामुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते, तसेच दंश झालेला भागावर काही दिवस सूज देखील येते. बागा येथे घडलेल्या एका गंभीर घटनेत, एका पर्यटकाला जेलीफिशने दंश केल्याने छाती दुखून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने उपचातांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

जेली फिश दोन प्रकारचे आहेत - विषारी आणि बिनविषारी. बहुतेक जेलीफिशचे मानवांसाठी निरुपद्रवी असतात आणि यामुळे केवळ त्वचेला थोडा त्रास होतो परंतु अगदी क्वचित प्रसंगी जेली फिश संपर्कात आल्याने गंभीर इजा होऊ शकते. जेली फिशने पर्यटकांना दंश केल्याच्या घटना  दुर्मिळ आहेत, परंतु गेल्या दोन दिवसात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे काही गंभीर घटना घडण्याआधी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या लॉकडाउन संपल्यानंतर गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मोकळे झाल्याने किनारपट्टीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

 

संबंधित बातम्या