झारखंडच्या कामगाराचा मडगावात खून

अवघ्या 10 तासात लावला खुनाचा छडा : साथीदारानेच केला खून
Crime News
Crime News Dainik Gomantak

मडगाव: ओल्ड गोवा येथे एका तरुण प्राध्यापिकेच्या झालेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण गोवा राज्य हादरून गेलेले असतानाच आज सकाळी मडगाव रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली असलेल्या रविराज हॉटेल समोर पार्क केलेल्या टेम्पोमध्ये एका 30 वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी तपास चक्रे फिरावल्याने अवघ्या 10 तासात या खुनाचा छडा लागला. ( Jharkhand worker stabbed to death in Madgaon )

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताचे नाव अमित किरकाटी (30) असे असून तो झारखंड येथील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश भल्ला (32) तोही झारखंड येथील असून मडगावात ते हमाल म्हणून काम करत होते.

Crime News
कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षारक्षकाला ड्रग्सचा पुरवठा करणारा पोलिसांच्या ताब्यात

ओव्हरब्रिज जवळच एका घरात ते दोघे एकत्र राहायचे. काल दारूच्या नशेत त्या दोघात भांडण होऊन त्याचे पर्यवसान खुनात झाले. सुरवातीला मयताने आपल्याला मारण्यास सुरवात केल्याने रागाच्या भरात आपण त्याच्या पोटात चाकू खुपसला असे आरोपीने सांगितले.

Crime News
केंद्रीय नोकऱ्यांबाबत स्थानिकांवर अन्याय

धारदार शस्त्र पोटात खुपसल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हा मृतदेह कुणाचा हेच समजू न शकल्याने पोलीस बुचकळ्यात पडले होते. या भागातील सीसीटीव्ही कमेऱ्यांची फुटेज तपासून पाहिली असता हा युवक जखमी अवस्थेत चालत त्या टेम्पो पर्यंत आल्याचे दिसून आले.

त्यामुळे जिथे मृतदेह आढळून आला त्यापासून सुमारे 100 ते 200 मीटर अंतरावर त्याच्यावर कुणीतरी हा हल्ला केला त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो युवक धडपडत त्या टेम्पो पर्यन्त आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com