'आर्मी व पोलीस सैनिकांमुळे जनता सुखाची झोप घेते'

मांद्रे मगो तर्फे मांद्रे मतदार संघातील स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबियांचा, आर्मी सेवा निवृत्त सैनिक आणि पोलीस निवृत्त अधिकारी पोलीस यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता
Jit Arolkar

Jit Arolkar

Dainik gomantak

मोरजी : देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या घर कुटुंबीयापासून दूर राहून, सीमेवर डोळ्यात तेल घालून वेळ प्रसंगी शत्रूंचे आपल्या छातीवर गोळ्या झेलून देशाचे रक्षण करतात. तर राज्यात पोलीस दल पाऊस असो ऊन असो किंवा दंगली असो, रात्र असो किंवा दिवस असो, काळाचे वेळाचे भान न ठेवता प्रामाणिक पोलीस दल सेवा करतात, त्यामुळेच आम्ही सुखाची झोप घेवू शकतो. असे प्रतिपादन मगोचे नेते जीत आरोलकर यांनी चोपडे येथे स्वतंत्र सैनिकांचे कुटुंब, आर्मी सेवा निवृत्त सैनिक आणि निवृत्त पोलीस यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

<div class="paragraphs"><p>Jit Arolkar</p></div>
डिचोलीच्या शांतादुर्गा विद्यालयाचे राज्यस्तरीय संचलन स्पर्धेत यश

यावेळी व्यासपीठावर निवृत्त पोलीस अधीक्षक आपा तेली, निवृत्त पोलीस अधिकारी नाना उर्फ नारायण सोपटे केरकर, मांद्रे माजी सरपंच (Sarpanch) सुभाष आसोलकर, मांद्रे मगो गट अध्यक्ष प्रवीण व्हायगणकर, माजी सरपंच आम्रोज फर्नांडीस, पंच महादेव हरमलकर, दयानंद सोपटे व मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे आदी उपस्थित होते.

मांद्रे मगो तर्फे मांद्रे मतदार संघातील (Constituency) स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबियांचा, आर्मी सेवा निवृत्त सैनिक आणि पोलीस निवृत्त अधिकारी पोलीस यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

सुरुवातीला संगीतकार शिवानंद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिल्पा शेटगावकर व दत्तराज च्यारी यांच्या संगीत सहकार्यातून सुरज शेटगावकर व त्यांच्या गटाने सुंदर स्वागत गीत आणि स्फूर्ती गीत सादर करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला .

<div class="paragraphs"><p>Jit Arolkar</p></div>
'गोवा विकासकामामध्ये अग्रेसर': दामोदर कासकर

यावेळी अर्जुन चोडणकर, नरेंद्र परब, दत्ताराम परब, विठू परब, उल्हास तिळवे, विजय नाईक, नामदेव गोकर्णकर, प्रमोद नाईक, राजेश कोरखंणकर, किरण ठाकूर, गणू नाईक, शिवम तिवरेकर, गुरुदास नाईक, अलेक्क्ष पिंटो, मेघश्याम मांद्रेकर, राजेश गावडे, चंद्रकांत मांद्रेकर, मिलिंद दाभोलकर, बाबली धुरी, हेमंत मांद्रेकर, महेंद्र मांद्रेकर, लाडू परब, संतोष कौशिक, मेघनाथ नाईक, भानुदास कोनाडकर , कृष्णा मोरजकर, अनंत परब, भानुदास पोल्जी, मंदार पोल्जी, पांडुरंग पोल्जी, येशवंत बुगडे, एकनाथ बुगडे वासुदेव गवंडी, वसत देसाई, कृष्णनाथ पार्सेकर, भोलानाथ पार्सेकर, कमलाकार पार्सेकर, शेख कासीम, बापू पोल्जी, नामदेव पोल्जी, कृष्णा च्यारी, नामदेव हरमलकर, त्रिविक्रम देसाई, विश्वासराव देसाई, गोविंद देसाई, अमृत देसाई, संजय प्रभुदेसाई, लाडजी नाईक, गुरुदास गवंडी, मधुकर पालयेकर, ज्ञानेश्वर पालयेकर, नामदेव परब, अनंत फोस्सो, जयराम साटेलकर, परशुराम कांबळी, मुरलीधर बर्डे, अवधूत बोडके, रामा रेडकर, कृष्णा विर्नोडकर, शिवा सावंत, विद्याधर सावंत, शिवाजी शेटगावकर , उल्हास शेटगावकर, राघोबा शेटगावकर, फटी शेटगावकर, कृष्णा शेटगावकर, फटू शेटगावकर, लक्ष्मिकान्त मोरजकर, बापू पोळशेट, रमाकांत शेटगावकर, भानुदास कोरगावकर, आतामाराम शेटगावकर, श्रीकांत शेटगावकर, सीताराम परब, रामदास महालदार, प्रेमनाथ महालदार, चंद्रकांत पाळणी, श्यामसुंदर शेटगावकर, स्नेहल साळगावकर, येशवंत गोवेकर, दिवाकर नाईक, अशोक लोहार, सुर्यकांत परब, नंदकुमार परब, लक्ष्मण बगळी, शिवराम नाईक, बबुलो नाईक, चंद्रकांत तुयेकर, आदी सैनिक पोलीस व काहीचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com