मॉडेल करिअर सेंटर मुळे नोकरीच्या संधी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

मॉडेल करिअर सेंटर हे केवळ सरकारी नोकरीसाठीच मर्यादित नसून नोकरीच्या उत्तम संधी असलेल्या खाजगी क्षेत्राचे दरवाजेही उघडेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.

पणजी: तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मॉडेल करिअर सेंटर ही एक उत्तम सुविधा म्हणून सिध्द होईल. मॉडेल करिअर सेंटर हे केवळ सरकारी नोकरीसाठीच मर्यादित नसून नोकरीच्या उत्तम संधी असलेल्या खाजगी क्षेत्राचे दरवाजेही उघडेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.

रोजगारनिर्मितीसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून आणि करिअरच्या अभिनव मार्गदर्शनासाठी आयुक्त कामगार व रोजगार कार्यालय, रोजगार विनिमय केंद्राने युवकांसाठी विविध करिअरमध्ये वाढ करण्यासाठी आदर्श करिअर केंद्र सुरू केले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कामगार व रोजगार मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत पाटो पणजी येथील श्रम शक्ती भवनात सुसज्ज अशा या केंद्राचे उद्‍घाटन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, तरूणांनी नोंदणी करावी आणि केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. केंद्रात खासगी क्षेत्राचा प्रवेश असेल ज्यायोगे तरूणांना करिअरच्या नाविन्यपूर्ण संधी मिळू शकतात.
मोन्सेरात यांनी नमूद केले की , केंद्र सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे जे नोकरी बदलणे,नोकरी तयार करणे आणि नोकरीचे सल्ले देणे यासारख्या तरुणांच्या गरजा भागवू शकेल. खासगी उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य उमेदवार शोधण्यास मदत होईल. राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने कामगार आणि रोजगार विभागाच्या कार्यक्षमतेस केंद्र वाढवेल.

सार्वजनिक अनुकूल इंटरफेससह समकालिन डिझाईन असलेल्या आधुनिक करिअर केंद्रासह रोजगार विनिमय कार्यालयांच्या आवारांचे नूतनीकरण करण्यात आले. ज्यात करिअरचे समुपदेशन केंद्र, दृकश्राव्य आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा आहेत. 
कौशल्य आणि उद्योजकीय संधी वाढविण्यासाठी एमसीसी तालुकास्तरावर खाजगी क्षेत्रासमवेत संयुक्तपणे विविध करिअर समुपदेशन उपक्रम राबवेल अशी माहिती देण्यात आली. कामगार आयुक्त राजू गावस यांनी स्वागतपर भाषण केले. रोजगार समुपदेशन अधिकारी बी. यु. केंकरे यांनी आभार मानले. गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने या करीअर केंद्राचे काम केले आहे.

संबंधित बातम्या