गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांचे राजकारणात सक्रिय पाऊल

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी आज सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. पोलीस मुख्यालयातून कार्यालय अधीक्षक या पदावरून त्यांनी दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

पणजी: गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी आज सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. पोलीस मुख्यालयातून कार्यालय अधीक्षक या पदावरून त्यांनी दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते सांताक्रुज विधानसभा मतदारसंघातील मेरशी या गावात राहतात.

विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे. सुरुवातीला त्यांचा कल हा आम आदमी पक्षाकडे होता, मात्र त्यांच्या भावाची फसवणूक करणाऱ्याला आम आदमी पक्षाने प्रवेश दिला त्यामुळे नदारेथ यांनी आपला मोर्चा गोवा फॉरवर्ड या पक्षाकडे वळवला आहे.

पणजीत आज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. गेले काही महिने समाज माध्यमावर नाझारेथ हे सरकार विरोधी आंदोलनाच्या पोस्ट शेअर करत होते त्यावरून ते राजकारणात येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार त्यांनी आज सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.

संबंधित बातम्या