सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना' पुन्हा सुरू करावी: जॉन नाझारेथ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

महामंडळात कर्मचाऱ्यांना सक्तीची करण्यात आलेली डीजीटल बायोमेट्रीक हजेरी रद्द करावी. अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पणजी : राज्यात अजूनही कोरोना संसर्ग कमी झाला नसून उलट त्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये तसेच महामंडळात कर्मचाऱ्यांना सक्तीची करण्यात आलेली डीजीटल बायोमेट्रीक हजेरी रद्द करावी. अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

काही दिवसांपूर्वीच म्हापसा येथील सरकारी कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता व त्याने बायोमेट्रीक केल्याने कार्यालयातील इतर १२ जणांना संसर्ग झाला होता. त्यामुळे सरकारने त्वरित डीजीटल बायोमेट्रीक हजेरी रद्द करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पत्राचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   

सरकारने जनतेच्या आरोग्याचा विचार करून दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) सुरू केली आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना पर्याय ठेवला होता. मात्र गेल्यावर्षी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रद्द करण्यात आली ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे नाझारेथ यांनी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी इस्पितळातील खर्चाची बिले परतफेड मिळतात मात्र डीडीएसएसवाय योजनेचे कार्ड असल्यास आपत्कालिन काळात सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेखाली असलेल्या गोव्यातील किंवा गोव्याबाहेरील इस्पितळाचा निवडक यादी समावेश असलेल्या ठिकाणी उपचार घेणे शक्य आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करावी.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या