काँग्रेस गट, व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

   कुडचडे काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत म्हणाले की नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी संयुक्त बैठक बोलावून बाजार परिसरात निर्जंतुक फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले असल्यामुळे त्यांना धन्यवाद. त्याच बरोबर बाजार एकदिवस बंद करून निर्जंतुक फवारणी करण्याची सूचना काँग्रेस तर्फे करण्यात आली होती.

कुडचडे:  कुडचडे गट काँग्रेस पक्षाने गेल्या आठवड्यात कुडचडे पालिकेला कुडचडे बाजार निर्जंतुकीकरण करावा म्हणून लेखी स्वरूपात मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी कुडचडे काँग्रेस गट आणी कुडचडे व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांना बोलावून संयुक्तरित्या बैठक घेऊन पुढील काही दिवसात संपूर्ण बाजारात निर्जंतुक फवारणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

 या प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोश्या परेरा म्हणाले की या पूर्वीच व्यापारी संघटना म्हणून सर्व सरकारी यंत्रणेला पत्रव्यवहार करून बाजारात निर्जंतुक फवारणी करण्याची मागणी केली होती पण फारसी कुणी मनावर घेतली नाही. 

पण आता नागराध्यक्षांनी फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले असुन कोविड रुग्ण वाढल्याने लोक बाजारात येण्यासाठी घाबरतात अश्या वेळी लोकांना चांगला संदेश मिळणार म्हणून कुडचडे बाजारात कुणीही चांगले काम करीत असल्यास त्यांचे स्वागत करून सहकार्य करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रोश्या परेरा यांनी सांगितले. 

   कुडचडे काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत म्हणाले की नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी संयुक्त बैठक बोलावून बाजार परिसरात निर्जंतुक फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले असल्यामुळे त्यांना धन्यवाद. त्याच बरोबर बाजार एकदिवस बंद करून निर्जंतुक फवारणी करण्याची सूचना काँग्रेस तर्फे करण्यात आली होती.

 पण बाजार बंद न करता पालिका संपूर्ण बाजारात फवारणी करीत असल्यास आमची काही हरकत नसून लोकांच्या मनात आसलेली भीती घालविण्याचे कार्य होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

या बैठकीला व्यापारी संघटना आणी कुडचडे काँग्रेस गट पदाधिकारी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या