Journalist is the leader of the society : Dr. Pramod Sawant
Journalist is the leader of the society : Dr. Pramod SawantDainik Gomantak

पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक : डॉ. प्रमोद सावंत

डिचोली पत्रकार कक्षाचे उद्‍घाटन

डिचोली : आजच्या नवीन पिढीची नाळ वाचन संस्कृतीशी जोडणे काळाची गरज आहे. स्वदेश, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे. समाजाचे दिशादर्शक असलेले पत्रकारच ही चळवळ पुढे नेऊ शकतात, असा विश्वास प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

रविवारी (ता.31) आयोजित सोहळ्यात डिचोली पत्रकार कक्षाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ग्रामीण पत्रकारांसाठी असलेल्या सरकारच्या विविध योजना पत्रकारांपर्यंत सुलभपणे पोचविल्या जातील.

त्याचबरोबर पत्रकारांना निर्भीडपणे काम करता येईल. याची काळजी सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगून डिचोली पत्रकार कक्ष हा पहिलाच कक्ष असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.

Journalist is the leader of the society : Dr. Pramod Sawant
Goa Crime : शापोरात आढळला विदेशी व्यक्तीचा मृतदेह

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून, समई प्रज्वलित करून आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार कक्षाचे उद्‍घाटन करण्यात आले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते. अन्य मान्यवरात माजी सभापती राजेश पाटणेकर आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी यांचा समावेश होता.

पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी यांनी स्वागत केले. सुरेश बायेकर, चंदू मांद्रेकर, जीवन कळंगुटकर, विनायक सामंत, उदय परब यांनी मान्यवरांना रोपटी प्रदान केली. दुर्गादास गर्दे यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला पत्रकार सुरेश वाळवे, डॉ. शेखर साळकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, नगरसेवक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचा गौरव

या सोहळ्यात पत्रकारितेत योगदान दिलेले स्व. औदुंबर च्यारी (मरणोत्तर) आणि रामनाथ देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार कक्षासाठी पाठपुरावा करणारे विशांत वझे आणि पत्रकार कक्षात लोकमान्य टिळक यांचे चित्र रेखाटलेले साहिल पेडणेकर यांचा गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com