पत्रकार महादेव खांडेकर यांचा गोवा काँग्रेस पक्षात प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

पत्रकार महादेव खांडेकर यांनी आता रीतसर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस भवनात झालेल्या समारंभात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

पणजी: पत्रकार महादेव खांडेकर यांनी आता रीतसर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस भवनात झालेल्या समारंभात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. खांडेकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे साखळी विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा पराभव करणे अधिक सुकर झाले आहे असे चोडणकर यांनी यावेळी नमूद केले.

चोडणकर यांनी सांगितले नेते या पक्षातून त्या पक्षात जात असतात मात्र विविध क्षेत्रातील लोक आता काँग्रेसकडे येऊ लागलेले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार याची खात्री अनेक क्षेत्रातील लोकांना आता वाटू लागलेली आहे. यामुळे पत्रकार खांडेकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेली दोन वर्षे साखळी मतदारसंघांमध्ये ते जनसेवेची कामे करत होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध त्यांनाच उमेदवारी मिळणार असा होत नाही. साखळीमध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यातूनच कोणालातरी उमेदवारी मिळणार आहे,मात्र साखळीतील जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी खांडेकर यांनी पक्षाचे व्यासपीठ निवडले आहे.

गोवा विधानसभेतून: ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’ 

खांडेकर यांनी यावेळी नमूद केले की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात साखळी मतदारसंघातील जनता आहे. जनतेचे कोणतेही प्रश्न दहा वर्षात डॉ. सावंत सोडवू शकलेले नाहीत. त्यांनी अनेक आश्वासने दिली मात्र त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. यामुळे जनता पर्यायाच्या शोधात आहे. देशाचा आणि राज्याचा विकास काँग्रेसच्या काळातच झालेला आहे याची जाणीव जनतेला आहे. यामुळे विधानसभेच्या येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार गोव्यामध्ये येईल यात कोणतीही शंका नाही. साखळी मधूनही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जनता मतदान करेल.

Shigmo 2021: गोवा सरकारने शिगमोत्सव रद्द केल्याने गोमंतकीय नाराज 

खांडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर आणि इतर नेते उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते होणार नव्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन 

संबंधित बातम्या