"हाउ इज द जोश" म्हणत जेपी नड्डांनी मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना दिला उजाळा
JP Nadda Twitter/ @ANI

"हाउ इज द जोश" म्हणत जेपी नड्डांनी मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना दिला उजाळा

पणजीत (Panaji) कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पणजीत (Panaji) कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. आपल्या भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, 'पर्रिकर यांनी गोव्यातील लोकांच्या जीवनशैलीत प्रगतीचे स्वप्न पाहिले होते. मला आठवते की, त्यांच्या शेवटच्या काळात आजारपणाशी झुंज देत असतानाही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढला नाही. लाइफ सपोर्ट सिस्टीम घालून त्यांनी अटल-सेतू पुलाची पाहणी केली आणि "हाउ इज द जोश" म्हटले.

JP Nadda
'न्याय, सत्य, विकासासाठी भाजपलाच पुन्हा सत्तेवर आणा': जे.पी.नड्डा

विरोधकांना लक्ष्य केले

पणजीतील कार्यकर्त्यांना संबोधित करताना जेपी नड्डा यांनी कोरोना महामारीच्या काळात सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली. 2020 मध्ये जेव्हा कोरोनाची लाट आली तेव्हा एप्रिलमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, भारत स्वतःची लस विकसित करण्यास तयार आहे. पंतप्रधानांनी 9 महिन्यांत देशाला 2 लसी दिल्या. परंतु, या महामारीच्या काळातही विरोधकांनी नकारात्मक भूमिका बजावली. मात्र दुसरीकडे राज्यातील विरोधक लोकांना सतत लसीकरण न करण्याचे आवाहन करत होते.

सर्वांचे लसीकरण केले

लसीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा समाचार घेत जेपी नड्डा म्हणाले की, विरोधक लसीला ‘मोदी टिका’, ‘भाजपची लस’ म्हणतात. मात्र आज त्या सर्वांना लस मिळाली आहे. मी त्यांना विचारतो, "मोदींची लस कशी होते?" तुम्हाला आजारापासून संरक्षण मिळाले आहे का? विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली. त्यांनी पंतप्रधानांना विरोध करताना भारतातील जनतेला विरोध केला आणि तेच आता मत मागत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com