तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल १२ मे पर्यंत तहकूब

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

तहलका मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal)  यांच्याविरोधात सध्या सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणावर गोवा कोर्ट आज निकाल जाहीर करणार आहे. आज सकाळच्या सत्रात कोर्ट तरुण तेजपाल यांच्याबाबत निकाल जाहीर करेल, अशी माहिती विशेष सरकारी वकील फ्रान्सिस्को टावरो यांनी दिली आहे.

तहलका मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्याविरोधात सध्या सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणावर गोवा आज सुनावणी पार पडली. आज सकाळच्या सत्रात कोर्ट तरुण तेजपाल यांच्याबाबत निकाल जाहीर करेल, अशी माहिती विशेष सरकारी वकील फ्रान्सिस्को टावरो यांनी दिली होती. दरम्यान आज झालेल्या सूनवणीवेळी म्हापसा जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जोशी यांनी तेजपाल प्रकरणाचा निकाल 12 मे पर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे.  लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली तरुण तेजपाल यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली होती. तरुण तेजपालवर त्यांच्या महिला सहकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप होता. तरुण तेजपाल यांनी उत्तर गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना जामीनही मिळला. (Judgment in Tarun Tejpal case pending till May 12) 

गोवा: शिक्षण संचालकांनी घुमजाव करत आदेशात केली दुरुस्ती

तरुण तेजपाल यांच्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र कोर्टात  तरुण तेजपाल प्रकरणी 8 मार्च रोजी अंतिम युक्तिवाद झाला होता. त्यानंतर कोर्टाने या खटल्याचा निकाल राखून ठेवत 27 एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली. तरुण तेजपालवर त्याच्या एका महिला सहकाऱ्याने नोव्हेंबर 2013 मध्ये लैंगिक छळाचा आरोप केला होता. आरोपानुसार गोव्यातील तहलकाच्या 'थिंक फेस्ट' कार्यक्रमादरम्यान पणजीतील पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपालने महिलेवर दोनदा लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजपाल यांना  30 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. तथापि, जून 2014 मध्ये जामीन मिळाल्यानंतर ते बाहेरच आहेत.  

गोव्यात तूर्त लॉकडाऊन नाही मात्र...

दरम्यान या खटल्यांतर्गत 29 सप्टेंबर 2017 रोजी कोर्टाने तरुण तेजपाल यांच्याविरूद्ध बलात्कार, शारीरिक लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भारतीय दंड संविधानाच्या (आयपीसी) विविध कलमांखाली खटला दाखल केला.  सुनावणी दारम्यान तेजपाल यांनी आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावत सुप्रीम कोर्टात  धाव घेतली. ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टानेदेखील आरोप फेटाळण्यास नकार दिला आणि खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश दिले. 8 मार्च नंतर आज (ता. 27) ल निकाल  जाहीर होणार होतात.मात्र न्यायालयाने 12 मे पर्यंत पुन्हा अंतिम निकाल राखून ठेवला आहे.

संबंधित बातम्या