ज्योती कुमारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी...

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांच्या जागी ज्योती कुमारी यांची बदली झाली आहे.
ज्योती कुमारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी...
Jyoti Kumari as South Goa District CollectorDainik Gomantak

पणजी: राज्य सरकारने आज तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा व सहा आयएएस सचिवांकडे असलेल्या खात्यांमध्ये बदल केल्याचा आदेश काढण्यात आला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांच्या जागी ज्योती कुमारी यांची बदली झाली आहे.

उद्योग संचालक स्वेतिका सचन (आयएएस 2014) यांच्याकडे गोवा मनोरंजन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. मायकल डिसोझा (आयएएस 2015) यांची जीआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे व त्यांच्याकडे जीपार्डचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी (आयएएस 2018) यांची दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. संजीव अहुजा यांची दिल्लीतील गोवा सदनचे निवास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे तर पी. एस. रेड्डी यांच्याकडे वाहतूक सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

Jyoti Kumari as South Goa District Collector
Goa: ‘कौन बनेगा आमदार’चा निकाल जाहीर

सरकारने काढलेल्या आदेशानुसार मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल यांच्याकडे दक्षता, गृह, सार्वजनिक बांधकाम, नागरी विमान, खाण, वित्त, वन व शहर व नगर नियोजन, पी. एस. रेड्डी यांच्याकडे बंदर, नदी परिवहन, मच्छिमारी, पुरातत्व, पुराभिलेख, वजन व मापे, संजय गिहार यांच्याकडे जलस्रोत, ग्रामीण विकास, पंचायत, कला व संस्कृती, सार्वजनिक गाऱ्हाणी, चोखा राम गर्ग यांच्याकडे कायदा व न्याय, कुशल विकास, रमेश वर्मा यांच्याकडे शहर विकास, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन, संदीप जॅकीस यांच्याकडे सर्वसामान्य प्रशासन, कामगार व रोजगार तसेच महसूल खात्याचे सचिव म्हणून तर रुचिका कट्याल यांच्याकडे विक्री कर आयुक्तपदाचा ताबा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.