Jyoti Kunkolienkar : लेकीनंतर आईलाही ‘साहित्य अकादमी’चा बहुमान

दुर्मिळ योगायोग : ‘मयुरी’चे मावजोंसह मान्यवरांकडून कौतुक
Jyoti Kunkolienkar
Jyoti KunkolienkarDainik Gomantak

Jyoti Kunkolienkar : दोन वर्षांपूवी ‘मयुरी’ कादंबरीचे प्रकाशन झाल्यानंतर भाई मावजोंपासून विविध मान्यवरांनी ‘मयुरी’चे कौतुक केले होते. त्याचवर्षी माझी मुलगी संपदाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. आज मला हा पुरस्कार जाहीर झाला, याचाही मला विशेष आनंद आहे. आजवर साहित्यिक दाम्पत्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचे माहीत होते. पण कदाचित मायलेकींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्याची ही वेगळी बाब असण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्योती कुंकळकर यांनी ‘गोमन्तक’कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

साहित्य अकादमी पुरस्कार मिळावा, ही प्रत्येक लेखकाची अपेक्षा असते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझ्या हातूनदेखील केव्हा तरी साहित्य अकादमी पुरस्काराच्या पात्रतेचे लेखन व्हावे, असे वाटत होते. येत्या काही दिवसांतच श्री गणेशाचे आगमन होणार आहे. अशावेळी चवथीच्या मुहूर्तावर ‘मयुरी’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याची आज मिळालेली गोड बातमी ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे, असेही कुंकळकर यांनी पुढे सांगितले. बाल साहित्यासाठी दत्ता दामोदर नायक, हरिश्चंद्र नागवेकर, शीला कोळंबकर यांनी परीक्षण केले. तर युवा साहित्यासाठी किरण म्हांब्रे, एस. एम. कृष्णा राव, शैलेंद्र मेहता यांनी परीक्षण केले.

Jyoti Kunkolienkar
Mapusa : म्हापशात चतुर्थीनंतर पदपथ-गटारांचे बांधकाम

कोकणी साहित्याला चालना देणार

पुरस्कार मिळाल्याने मी आनंदीत आहे. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे. मी कोकणी साहित्याला चालना देण्यासाठी काम केले आहे, आजही करत आहे आणि भविष्यातही कोकणी साहित्याचा प्रसार करण्यासाठी उत्साहाने आणि समर्पित भावनेने काम करेन, अशा शब्दांत युवा साहित्य पुरस्कार विजेते फादर मायरन जेसन बार्रेटो यांनी आपली भावना व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com