Kadamba Bus Fire: म्हापसा येथे कदंब बसला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

बसच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचे समोर येत आहे.
Kadamba Bus Fire
Kadamba Bus FireDainik Gomantak

म्हापसा: म्हापसा येथे कदंब बसला आग लागण्याची घटना आज घडली. बसच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, घटनास्थळी तत्परतेन अग्निशमन दल दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली आहे.

(Kadamba bus caught fire at Mapusa near court junction)

Kadamba Bus Fire
Ponda Municipality: नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव आज बारगळला

म्हापसा येथील कोर्ट जंक्शन येथे ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हरमलहुन म्हापश्याच्या दिशेने येणाऱ्या कदंबा बसला इंजिनमधील बिघाडाने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी बसचालकाने प्रसंगावधन राखत यातील प्रवाशांना तातडीने सुरक्षितरित्या बाहेर काढून नंतर अग्निरोधकाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविले.

म्हापशात मोठी बस दुर्घटना टळली!

बसमध्ये जवळपास 35 ते 40 प्रवासी होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी यावेळी झाली नाही. ही घटना दुपारी 3.05च्या सुमारास घडली. हरमल मार्गे ही कदंबा बस (जीए 03 एक्स 0369) म्हापशाला येत असताना कोर्ट जंक्शनवरील चढावर बस असताना बसच्या इंजिनमधून अचानकपणे धूर येऊ लागला. त्यानंतर चालकाने बस चौकात आणून बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. या घटनेची माहिती अग्निशमन दलास कळविण्यात आली असता जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचे फवारे व अग्निरोधकाच्या साहाय्याने ही आग नियंत्रणात आणली. तसेच बॅटरी प्लग काढले, जेणेकरून आग भडकू नये. यावेळी बसचालक सदानंद मोरजकर यांनी प्रसंगावधन राखल्याने मोठी दुर्घटना टळली. तर वाहक सुवर्णा मोरजकर यांनीही प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास मदत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com