पर्वरीत कदंब बसची कारला धडक; चालक जखमी

बसवरील नियंत्रण गेल्याने अपघात
पर्वरीत कदंब बसची कारला धडक; चालक जखमी
Kadamba bus hit the car, Carrier injured in porvorimDainik Gomantak

पणजी : पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या कदंब बसवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने बसने पर्वरी येथील मॉल दी गोवा जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला आदळून पुढे जाऊन झाडाला धडक दिली. हा अपघात सकाळी 10.25 च्या सुमारास घडला. अपघातात वाहक व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.

(Kadamba bus hit the car, Carrier injured in porvorim)

Kadamba bus hit the car, Carrier injured in porvorim
हणजूणमधील आणखी एका बेकायदा मसाज पार्लरला टाळे

या अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव मुकेश शेटगावकर तर वाहकाचे नाव सुनिल पोरखणकर असे आहे. या बसमध्ये कदंबचा कर्मचारी प्रज्योत बर्वे हा मागील आसनावर बसला होता. अपघातात मुकेश शेटगावकर याच्या पायाला तर सुनिल याच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे. प्रज्योत याला किरकोळ मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. कदंब बस ही पणजीहून पर्वरी येथील कदंब डेपो येथे जात होती त्यामुळे बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. पर्वरी पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या चालक व वाहकाला लोकांनी बाहेर काढले व पर्वरीतील जवळच्या इस्पितळात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्या दोघांना त्यानंतर गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.

Kadamba bus hit the car, Carrier injured in porvorim
सुवासिनींच्या उत्साहाला उधाण! राज्यात आज वटपौर्णिमा धार्मिक विधीनुसार साजरी

कदंब बस चालकाचे नियंत्रण गेले असल्याचा तर्कवितर्क काढण्यात येत असला तरी या कदंब बसची व्यवस्थित देखभाल केली जात नसल्याने अपघात होत आहेत. ज्या तऱ्हेने बसचे पुढील चाक फिरले होते त्यावरून बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन हा अपघात घडल्याची चर्चा तेथे उपस्थितांत सुरू होती.

इलेट्रिक कदंब बस मेरशी येथे पडली बंद

राज्यात नव्या इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील कदंब बसगाड्या राष्ट्रीय महामार्गावर धावत असल्या तरी त्या वारंवार रस्त्यावर बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी पणजीच्या दिशेने येणारी इलेक्ट्रिक कदंब बस मेरशी येथील राष्ट्रीय महामार्गावर बंद पडल्याने ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची बरीच तारांबळ उडाली. या बंद पडणाऱ्या कदंब बसेसमुळे विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्गाला मनस्तःप सहन करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com