‘नंबर १’ची कदंब बस धावली धाव्यातून

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

 गोवा राज्याला मुक्ती मिळाल्यानंतर १९८० साली राज्यात कदंब महामंडळ सुरू झाले व खऱ्या अर्थाने दळणवळणाची सोय झाली. १९८०  साली जेव्हा कदंबची पहिल्या नंबरची गाडी तयार झाली. ती गाडी सर्वात प्रथम सत्तरी तालुक्यातील धावे गावातून सुरवात केली होती. धावे ते पणजी अशी ही ‘नंबर १’ कदंब गाडी धावत होती.

वाळपई : गोवा राज्याला मुक्ती मिळाल्यानंतर १९८० साली राज्यात कदंब महामंडळ सुरू झाले व खऱ्या अर्थाने दळणवळणाची सोय झाली. १९८०  साली जेव्हा कदंबची पहिल्या नंबरची गाडी तयार झाली. ती गाडी सर्वात प्रथम सत्तरी तालुक्यातील धावे गावातून सुरवात केली होती. धावे ते पणजी अशी ही ‘नंबर १’ कदंब गाडी धावत होती. त्यामुळे एक नंबरच्या गाडीचा मान धावे गावाला मिळाला होता. त्यावेळेपासून गेली ३९ वर्षे धावे गावात निरंतर अशी कदंब सेवा सुरू असून कदंब महामंडळाने धावेवासीयांशी वेगळे नाते प्रस्थापित केले आहे. 

यंदा कदंब महामंडळाला ४० वर्षे होत आहेत. दरवर्षी दसरा सणाला धावे गावातील नागरिक सकाळी कदंब गाडीची पूजा करतात. यंदाही रविवारी धावे ग्रामस्थ कदंब गाडीची पूजा करणार आहेत. धावे तसेच धावे वरचावाडा, उस्ते या गावातही लोकांतर्फे पूजा केली जाईल. यावेळी कदंब गाडी फुलांनी सजविली जाते. धावे गावातून दररोज सकाळी ६.३० वाजता ही कदंब गाडी पणजीकडे निघते व दुपारी पुन्हा धावे गावात येऊन रात्री धावे गावात थांबते. कदंब सेवेमुळे ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीची चांगली सोय झालेली आहे. प्रवासी तसेच शालेय मुलांना, नोकरदारांना या सकाळच्या कदंब सेवेचा मोठा फायदा होतो. 

१९८० साली जेव्हा कदंब गाडी तयार झाली होती. त्यावेळी पर्येचे विद्यमान आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह रावजी राणे यांनी ग्रामीण भागाचा वाहतुकीचा विचार करून सत्तरी तालुक्यात धावे गावाची निवड केली होती. त्याकाळी कदंब गाडी सुरू होणार याची धावेवासीयांना उत्सुकता होती. कशी असेल ही कदंब गाडी याचे एक कुतूहल निर्माण झाले होते. त्यादिवशी धावे गावात लोकांनी कदंब गाडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्या काळात ग्रामीण भागात दळणवळणाची साधने नसल्याने लोकांना चालतच शहराकडे जावे लागत होते.

खास करून विद्यार्थी वर्गाला वाहतुकीची सोय नव्हती, पण कदंब गाडी सुरू झाल्यानंतर मात्र सत्तरीच्या ग्रामीण भागाची हळुहळू परिस्थिती बदलू लागली. कालांतराने सत्तरीतील सर्वच गावात कदंब गाडी सुरू केली. त्यामुळे सत्तरी तालुक्यासाठी कदंब गाडी अगदी सामान्य लोकांना वरदानच ठरलेली आहे.

रात्री रंगरोषणाईने गाडीचे आगमन होणार
दसऱ्या दिवशी रविवारी रात्री दरवर्षीप्रमाणे रात्रीच्यावेळी पणजीतून खास रंगरोषणाई करून कदंब बस पाठविली जाणार आहे. धावे शांतादुर्गा मंदिरात गावकर मंडळी या खास गाडीची रात्री पूजा करतात. यावेळी गाडीची विद्युत रोषणाई खुलून दिसते.
दसऱ्या दिवशी रविवारी रात्री दरवर्षीप्रमाणे रात्रीच्यावेळी पणजीतून खास रंगरोषणाई करून कदंब बस पाठविली जाणार आहे. धावे शांतादुर्गा मंदिरात गावकर मंडळी या खास गाडीची रात्री पूजा करतात. यावेळी गाडीची विद्युत रोषणाई खुलून दिसते.

संबंधित बातम्या