खरपाल-म्हापसा मार्गावर लाडफेमार्गे 'कदंब' ची बससेवा सुरु

एका विशेष कार्यक्रमात डिचोलीचे (Bicholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी श्रीफळ वाढवून या बससेवेचा शुभारंभ केला.
खरपाल-म्हापसा मार्गावर लाडफेमार्गे 'कदंब' ची बससेवा सुरु
Kadamba Bus ServiceDainik Gomanatk

डिचोली: भागातील प्रवाशांची विशेष करून विद्यार्थीवर्गाची गैरसोय लक्षात घेऊन अखेर लाडफेमार्गे खरपाल-म्हापसा मार्गावर 'कदंब' (Kadamba) ची बससेवा सुरु करण्यात आली आहे. रविवारी एका विशेष कार्यक्रमात डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी श्रीफळ वाढवून या बससेवेचा शुभारंभ केला. यावेळी वाहतूक खात्याचे अधिकारी कमलाकांत कारापूरकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अधिकारी पुरुषोत्तम खरबे आणि उदय मालवणकर, लाटंबार्सेचे सरपंच ज्ञानेश्वर गवस, उपसरपंच यशवंत वरक, पंच कुंदा च्यारी, माजी पंच पद्माकर मळीक, देवस्थानचे सचिव पुरुषोत्तम मळीक, सुधाकर धुरी, उमेश मळीक, राजेश्वरी मळीक आदी नागरिक उपस्थित होते.

बससेवेमुळे लाडफे आदी ग्रामीण भागातील विशेष करून विद्यार्थीवर्गाची मोठी सोय होणार आहे. असे सभापती पाटणेकर यांनी सांगून, कदंब वाहतूक महामंडळाला धन्यवाद दिले. बाबू चननकर यांनी स्वागत केले. अच्युत मळीक यांनी सूत्रसंचालन केले. बससेवेअभावी लाडफे भागातील विद्यार्थीवर्गाची मोठी गैरसोय होत होती. या भागातून बससेवा सुरु करावी. अशी गेल्या तीन वर्षांपासून नागरिक मागणी करीत होते. अखेर कदंब महामंडळाने बससेवा सुरु केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी अच्युत गावस आणि बाबू चननकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.

Kadamba Bus Service
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

बसचे वेळापत्रक

सकाळी 6.30 वा. खरपालहून सुटणारी ही बसगाडी 7.30 वाजता लाडफेमार्गे डिचोलीहून म्हापसा मार्गावर वाहतूक करणार आहे. दुपारी 12.20 वा. म्हापसाहून परतीच्या मार्गावर वाहतूक करणार आहे. तसेच दुपारी 2.30 वा. खरपालहून म्हापसा आणि सायंकाळी 5.30 वा. म्हापसाहून परत लाडफेमार्गे खरपालला परतणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com