गोव्यातील कदंब बससेवा बंद.....

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

त्यामुळे कदंबा महामंडळाने सिंधुदुर्गात सोडल्या जाणाऱ्या बसेस आजपासून बंद केल्याची माहिती कदंबा वाहतूक महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘गोमन्तक'ला दिली.

 

पणजी: महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून गोवा, राजस्थान, दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या लोकांसाठी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे.

त्यामुळे कदंबा महामंडळाने सिंधुदुर्गात सोडल्या जाणाऱ्या बसेस आजपासून बंद केल्याची माहिती कदंबा वाहतूक महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘गोमन्तक'ला दिली. या सेवेमुळे गोव्यात सिंधुदुर्गातून काही प्रमाणात लोक रोजगारासाठी दररोज ये-जा करीत होते, त्यांच्याही रोजगाराचा पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण होणार आहे. कदंबा महामंडळाने सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ या बसेसही बंद केल्या आहेत.

संबंधित बातम्या