बढत्यांपासून वंचित कदंब महामंडळाच्या 38 कर्मचाऱ्यांना दिलासा

मरण पावलेल्या 12 कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनाही नियुक्ती पत्रे 
Kadamba Employees gets Promotion in Goa
Kadamba Employees gets Promotion in GoaDainik Gomantak

मडगाव ः कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बराच काळ प्रलंबित राहिलेल्या बढत्यांची प्रक्रीया पूर्ण करण्यात आल्या असून 38 कर्मचाऱ्यांना बढत्यांचे आदेशपत्र कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सेवेत असताना मरण पावलेल्या 12 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही सेवेत सामावून घेण्यात आले आहे. 

कदंब महामंडळाच्या पर्वरी येथील मुख्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तुयेकर यांनी यासंबंधीची आदेशपत्रे कर्मचाऱ्यांना प्रदान केली. सेवेत सामावून घेतलेल्या मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कटुंबातील सदस्यांमध्ये दोघां महिलांचा समावेश आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. यापैकी एका महिलेची वाहकपदी तर एका महिलेची कारकूनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बढत्या बराच काळ प्रलंबित होत्या. या कर्मचाऱ्यांपैकी 8 वाहतूक नियंत्रकांची सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदी (एटीआय), तर 30 वाहकांची वाहतूक नियंत्रकपदी बढती करण्यात आली आहे.

बराच काळ प्रलंबित राहिलेल्या बढत्या मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना हुरुप आला आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या कारभारात पुढे दिसून येईल, असा विश्वास तुयेकर यांनी व्यक्त केला.

Kadamba Employees gets Promotion in Goa
डिचोली पालिका परिसरात दोन दिवसांपासून पाण्याची गंभीर समस्या; नागरिकांचे हाल

कदंब महामंडळाच्या सेवेत 30 - 35 वर्षे होऊनही बढती मिळाली नव्हती. पण, चेअरमनपदाचा ताबा घेतल्यानंतर तुयेकर यांनी प्रलंबित बढत्यांची प्रक्रिया प्राधान्यक्रमाने पूर्ण करून न्याय दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी तुयेकर यांचे यावेळी आभार मानले. मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरेक नॅटो व सरव्यवस्थापक संजय घाटे यांचेही कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

बढती मिळालेल्यांपैकी चार जण पुढील महिन्यात सेवेतून निवृत्त होणार आहेत. निदान सेवा काळाच्या अखेरीस का होईना पण, बढती मिळाल्याचे समाधान लाभले, अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com