गोव्यातील कदंब कर्मचारी संघटनेचा महामंडळाला इशारा

कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या एक महिन्यात मान्य न झाल्यास बेमुदत संप
गोव्यातील कदंब कर्मचारी संघटनेचा महामंडळाला इशारा
Kadamba employees union in Goa warns corporation Dainik Gomantak

पणजी: गोवा सरकारच्या (Goa Government) मालकीच्या कदंब बस वाहतूक महामंडळातील (Kadamba Bus Transport Corporation) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केटीसी ड्रायव्हर्स आणि संलग्न कर्मचारी असोसिएशनच्या वतीने आझाद मैदानावर निदर्शने करत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या एक महिन्यात मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी यावेळी दिला.

Kadamba employees union in Goa warns corporation
उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल काय म्हणतेय जनता...

पणजी: कदंब कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून 2016 पासूनचा फरक देण्यात यावा. कंत्राटी चालक, वाहक, तंत्रज्ञ कामगारांना कायम करण्यात यावे. समान काम समान वेतन लागू करावे, किमान 25000 वेतन द्यावे, इलेक्ट्रॉनिक बस कंत्राटदाराऐवजी महामंडळाने चालवावेत आदी मागण्यांसाठी आझाद मैदानावर हा एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण आणि धरणे कार्यक्रम झाला. यावेळी कामगार नेते राजू मंगेशकर, कदंब बस वाहतूक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावकर, आयटकचे सचिव प्रसन्ना उटगी, चंद्रकांत चोडणकर, आत्माराम गावस, निशिमंतो लोबो आदी पदाधिकारी आणि महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.