कदंबच्या नव्या अध्यक्षांसमोर समस्यांचं मोठं आव्हान

मडगाव बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी प्रयत्नशील, आठवडाभरात होणार बैठक
Kadamba Transport Corporation
Kadamba Transport CorporationDainik Gomantak

मडगाव : नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांची कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानी पदभारही सांभाळला. मात्र कंदब महामंडळात ज्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवणे हे नव्या अध्यक्षासमोर एक आव्हानच असणार आहे. आमदार तुयेकर यांनी महामंडळामध्ये अनेक समस्या आहेत हे मान्य केले. मात्र त्या नेमक्या कोणत्या याचे स्पष्टीकरण दिले नाही. तरी या समस्या योग्य मार्गाने सोडविल्या जातील अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

Kadamba Transport Corporation
गोव्यातील कर्तबगार महिलांसाठी आता पिंक रिक्षा

कदंब महामंडळाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवणे हे आमदार तुयेकर समोर सर्वांत मोठे आव्हान असेल. तसेच बस ड्रायव्हर, कंडक्टर इतर कर्मचाऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत. ते चुटकीसरशी सोडविणे कठीणच आहे. मडगावचा कदंब बस स्टॅण्ड नव्याने बांधण्याची गरज आहे. सध्या बस स्टॅण्डची परिस्थिती बिकट आहे. त्यासाठी आपण हा बस स्टॅण्ड बांधण्यास प्राधान्य देणार आहे. मात्र हे काम निधी उपलब्धतेवर अवलंबून आहे, असेही आमदार तुयेकर यांनी सांगितले.

कदंब बस स्टॅण्ड बांधण्याच्या बाबतीत आपण मुख्यमंत्री तसेच वाहतूक मंत्री यांच्याशी बोलणार आहे. तसेच 2011 साली नव्या बस स्टॅण्डसाठी जो आराखडा तयार केला होता तो पाहणार आणि त्याचा अभ्यास करणार असेही तुयेकर म्हणाले.

Kadamba Transport Corporation
आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत गोव्यातील कृषी, पशुसंवर्धन

2011 साली मडगाव कदंब बस स्टॅण्डसाठी अंदाजे 200 कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. 2011 साली मडगावचे आमदार दिगंबर कामत जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा या बस स्टॅण्डचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. 2012 साली भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या बस स्टॅण्ड सबंधी काहीच हालचाल झाली नाही. नवीन कदंब बस स्टॅण्डचे बांधकाम निधी उपलब्धतेप्रमाणे टप्प्या टप्प्याने करता येईल, असेही तुयेकर यानी स्पष्ट केले.

मडगाव बस स्थानकाबद्दल आपण अधिकाऱ्यांशी बोललो आहे. येथील कचरा समस्या सोडवावी लागेल. जे गाडेवाले आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत. स्थानकाच्या नुतनीकरणाबद्दल चर्चा करण्यात आठवडाभरात बैठक बोलावली जाईल आणि या योजनेस अंतिम स्वरुप दिले जाईल असे तुयेकर यांनी सांगितले.

बस स्थानकावर शौचालय, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी व्यवस्था यावर विचार होणे गरजेचे आहे. बंद पडलेले कॅंटीन सुरु करणे हे सुद्धा नव्या अध्यक्षासमोर आव्हान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com