कदंबच्या गोवा-कर्नाटक बससेवेला उत्तम प्रतिसाद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

बस चालकांना महामंडळाने थर्मलगन दिली असून बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांची तापमान तपासले जाते. त्याशिवाय प्रत्येक फेरीनंतर बस निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असे घाटे म्हणाले.

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने सुरु केलेल्या कारवार व बेळगाव या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्याशिवाय बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांची थर्मलगनद्वारे शारीरिक तापमान तपासले जात असल्याची  माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले. 

घाटे म्हणाले की, कदंब महामंडळाने बेळगाव आणि कारवारला शनिवार (काल) पासून सुरु केल्या. त्यात कारवारला ५ फेऱ्या आणि बेळगावसाठी ४ फेऱ्या होत आहेत. यात बेळगावला गोव्यातून जाणारे चांगले प्रवासी मिळतात पण येताना तेवढे प्रवासी मिळत नाहीत. तर त्याऊलट कारवार बस सेवेचे चित्र आहे. त्यात कारवारला गोव्यातून जाणारे कमी प्रवासी असतात, तर कारवारमधून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.  टाळेबंदीच्या काळात अनेकांनी गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता, त्यामुळे राहिलेली काम करण्यासाठी बेळगाव, कारवारला  ते जात आहेत.

बस चालकांना महामंडळाने थर्मलगन दिली असून बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांची तापमान तपासले जाते. त्याशिवाय प्रत्येक फेरीनंतर बस निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असे घाटे म्हणाले.

बेळगाव येथून प्रवासी कमी मिळत आहेत. पूर्वी कर्नाटकातून इतर भागातून कदंबाच्या बसेस येत होत्या त्यामुळे तेथे त्यांना प्रवाशी मिळत होते. जोर्यंत लोकांना माहीत होत नाहीत तोपर्यंत प्रवाशी बेळगावपर्यंत येणार नाहीत. चार - पाच दिवसांनी पुन्हा सर्वेक्षण करावा लागेल, असे घाटे म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या