काकोडा येथील अपघातात महिला ठार

Dainik Gomantak
सोमवार, 29 जून 2020

जखमी अवस्थेत लालबी शेख यांना काकोडा कुडचडे आरोग्य केंद्रात व तेथून हॉस्पिसीयो व अधिक उपचारांसाठी गोमेकॉत पाठविले असता तेथे उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. लालबी शेख या शेळपे सांगे येथील जलशुद्धिकरण प्रकल्पात काम करीत होत्‍या.

कुडचडे :

काकोडा येथे दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सांगे येथील महिलेचे उपचारादरम्यान गोमेकॉत मृत्‍यू झाला. जीए०९ जे ४१०१ या क्रमांकाची दुचाकी कुडचडेच्या दिशेने जात होती, तर चारचाकी क्रमांक जीए०९ डी ५२३५ ही चारचाकी सांगेच्या दिशेने जात असताना काकोडा येथील प्रवीण बारजवळ दोन्‍ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. दुचाकी चालक वोरकटो दांडो सांगे येथील लालबी शेख (५६ वर्षे) या गंभीररीत्या जखमी झाल्‍या. हा अपघात दुपारी ३.३० वा.च्‍या सुमारास घडला. जखमी अवस्थेत लालबी शेख यांना काकोडा कुडचडे आरोग्य केंद्रात व तेथून हॉस्पिसीयो व अधिक उपचारांसाठी गोमेकॉत पाठविले असता तेथे उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. लालबी शेख या शेळपे सांगे येथील जलशुद्धिकरण प्रकल्पात काम करीत होत्‍या. घटनेचा पंचनामा हवालदार रामा मिसाळ यांनी निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शना खाली केला आहे. वाहनचालक राजेंद्र नाईक (मरांगण सांगे) याला कुडचडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

संबंधित बातम्या