कर्नाटकच्या कळसा-भांडुरामुळे निसर्गाचाही ऱ्हास ; राज्यातील पाणीपुरवठ्याबरोबरच वन्यजीव, वनस्पतीवरही परिणाम शक्य 

ग्राऊंड रिपोर्ट 3 : संजय घुग्रेटकर
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

निसर्गाचा ऱ्हास कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे होत असून भविष्यात तो अधिक होणार आहे, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. पावसाळ्यातील पाणी कळसा कालव्यातून कर्नाटकने वळवले, पावसाळा संपला आता पुढच्या पावसाळ्यात पाहू, अशी राजकीय नेत्याची दृष्टी असेल, असे दिसते.

खांडोळा ः  कर्नाटकने म्हादईचा घाटावरच गळा घोटण्याच्या चालविलेल्या उद्योगांमुळे बा. भ. बोरकरांच्या आशयघन काव्यातील निसर्ग आणि प्रत्यक्ष गोव्यातील निसर्ग यात डिसेंबरमध्येच मोठ्या प्रमाणात फरक जाणवू लागला असून निसर्गाचा ऱ्हासही कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे होत असून भविष्यात तो अधिक होणार आहे, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
पावसाळ्यातील पाणी कळसा कालव्यातून कर्नाटकने वळवले, पावसाळा संपला आता पुढच्या पावसाळ्यात पाहू, अशी राजकीय नेत्याची दृष्टी असेल, असे दिसते. कारण इतर अनेक राज्यव्यापी प्रश्नावर रान उठविणारे नेते सध्या मोले, कोळसा, महामार्ग, रेल्वे दुपदरीकरण प्रश्नावर बोलत आहेत. पण म्हादईचा प्रश्न खूप मोठा आहे. या प्रश्नावरही विचार व्हायला हवा. म्हादईचे पाणी पळविल्याने या परिसरातील जवळ ४२ प्रकारच्या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,  बऱ्याच ठिकाणी पाण्याचा उलट्या दिशेने प्रवाह वळविण्यासाठी वनस्पती, वृक्षतोड करण्यात आली आहे. वाघ, गवा, अस्वल, हत्तीसारखे २५ प्रकारचे सस्तन प्राणी, किंग कोब्रा, अजगरासारखे १५ जातीचे साप, १२८ प्रकारचे पक्षी, २९ प्रकारची फुलपाखरे, किंगकोब्रा विषारी सर्प या परिसरात आहेत. 

हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच मोठे संकट निर्माण झाले आहे. सदर प्रकल्प पूर्णपणे मार्ग लागल्यास या वनसंपदा,  वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात येणार आहे. फक्त कळसातून मलप्रभेत पाणी वळविल्याने पाणी कमी झाले आहे, तर इतर प्रकल्प पूर्ण केल्यावर किती भयानक स्थिती होईल, याचा अंदाज सर्वसामान्यांनाही सहज येईल.
पावसाळा संपल्यामुळे सध्या जमिनीत मुरलेले पाणी झऱ्याप्रमाणे मलप्रभेच्या दिशेने जात आहे. कळसा नाल्याचा काही भाग जवळ जवळ सुकला आहे. पूर्वी तो नाला सुकत नव्हता, नैसर्गिक पद्धतीने पाणी वाहात असल्यामुळे उन्हाळ्यातही काही ठिकाणी वन्य जीवांना तेथे पाणी मिळत होते. 

या नाल्याबरोबरच इतर अनेक उपप्रवाहही मलप्रभेत पाणी नेण्यासाठी वळविण्यात आल्याने या परिसरात सध्या रखरख सुरू झाली असून या उपद्व्यापाचे परिणाम म्हादई खोऱ्यात भोगावे लागणार आहेत. जवळ ४३ ते ५० टक्के म्हादईच्या खोऱ्यावर परिणाम होणार असून त्याची सुरूवातही झाली आहे. कर्नाटकने म्हादईचा घाटावरच गळा घोटण्याच्या चालविलेल्या उद्योगांमुळे बा. भ. बोरकरांच्या आशयघन काव्यातील निसर्ग आणि प्रत्यक्ष गोव्यातील निसर्ग यात डिसेंबरमध्येच मोठ्या प्रमाणात फरक जाणवू लागला असून निसर्गाचा ऱ्हासही कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे होत असून भविष्यात तो अधिक होणार आहे, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

पावसाळ्यातील पाणी कळसा कालव्यातून कर्नाटकने वळवले, पावसाळा संपला आता पुढच्या पावसाळ्यात पाहू, अशी राजकीय नेत्याची दृष्टी असेल, असे दिसते. कारण इतर अनेक राज्यव्यापी प्रश्नावर रान उठविणारे नेते सध्या मोले, कोळसा, महामार्ग, रेल्वे दुपदरीकरण प्रश्नावर बोलत आहेत. पण म्हादईचा प्रश्न खूप मोठा आहे. या प्रश्नावरही विचार व्हायला हवा. म्हादईचे पाणी पळविल्याने या परिसरातील जवळ ४२ प्रकारच्या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,  बऱ्याच ठिकाणी पाण्याचा उलट्या दिशेने प्रवाह वळविण्यासाठी वनस्पती, वृक्षतोड करण्यात आली आहे. वाघ, गवा, अस्वल, हत्तीसारखे २५ प्रकारचे सस्तन प्राणी, किंग कोब्रा, अजगरासारखे १५ जातीचे साप, १२८ प्रकारचे पक्षी, २९ प्रकारची फुलपाखरे, किंगकोब्रा विषारी सर्प या परिसरात आहेत. 

हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच मोठे संकट निर्माण झाले आहे. सदर प्रकल्प पूर्णपणे मार्ग लागल्यास या वनसंपदा,  वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात येणार आहे. फक्त कळसातून मलप्रभेत पाणी वळविल्याने पाणी कमी झाले आहे, तर इतर प्रकल्प पूर्ण केल्यावर किती भयानक स्थिती होईल, याचा अंदाज सर्वसामान्यांनाही सहज येईल.
पावसाळा संपल्यामुळे सध्या जमिनीत मुरलेले पाणी झऱ्याप्रमाणे मलप्रभेच्या दिशेने जात आहे. कळसा नाल्याचा काही भाग जवळ जवळ सुकला आहे. पूर्वी तो नाला सुकत नव्हता, नैसर्गिक पद्धतीने पाणी वाहात असल्यामुळे उन्हाळ्यातही काही ठिकाणी वन्य जीवांना तेथे पाणी मिळत होते. 

या नाल्याबरोबरच इतर अनेक उपप्रवाहही मलप्रभेत पाणी नेण्यासाठी वळविण्यात आल्याने या परिसरात सध्या रखरख सुरू झाली असून या उपद्व्यापाचे परिणाम म्हादई खोऱ्यात भोगावे लागणार आहेत. जवळ ४३ ते ५० टक्के म्हादईच्या खोऱ्यावर परिणाम होणार असून त्याची सुरूवातही झाली आहे.

-   संजय घुग्रेटकर

अधिक वाचा :

कळसाचे पाणी वळविल्याने म्हादईवर संकट 

गोव्याची जीवनदायिनी म्हादई आटतेय?

म्हादईवर कर्नाटकचा घाला -

संबंधित बातम्या