शिरोड्यातील कामाक्षी मंदिर झाले खुले

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

कोरोनामुळे गेले नऊ महिने बॅंद असलेले भाविकांचे श्रद्धास्थान  शिरोडा येथील श्री कामाक्षीचे मंदिर आज (सोमवारी) भाविकांना मुखदर्शनासाठी खुले करण्यात आले.

शिरोडा: कोरोनामुळे गेले नऊ महिने बॅंद असलेले भाविकांचे श्रद्धास्थान  शिरोडा येथील श्री कामाक्षीचे मंदिर आज (सोमवारी) भाविकांना मुखदर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर खुले होणार असल्याचे वृत्त दैनिक गोमन्तकने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते, त्यामुळे गोव्यासह बाहेरील राज्यातील भाविक श्रीच्या दर्शनासाठी आतूर झाले होते.

 मंदिर खुले केल्यानंतर सामाजिकत अंतर ठेवून तसेच चेहऱ्याला मास्क बांधून व सॅनिटायझरचा वापर करून शेकडो भाविकांनी श्रीचे दर्सन घेतले. कोरनोचा प्रादूर्भाव गोव्यात वाढू लागल्याने गेल्या १९ मार्चला श्रीच्या कौलप्रसादानुसार हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. गेले नऊ महिने पुजाऱ्याच्या नित्यपूजा आरती व्यतिरिक्त इतर कोणतेच धार्मिक कार्यक्रम देवालयात झाले नव्हते.

याशिवाय नवरात्रोत्सव, दसरोत्सवालाही फाटा देण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाल्याने महाजन समितीने श्रीचा पुन्हा कौलप्रसाद घेऊन भाविकांच्या मागणीनुसार मंदिर पुन्हा खुले केले आहे.  दरम्यान, सकाळी आठ ते अकरा व दुपारी तीन ते सहा या वेळेत मंदिर खुले ठेवले जाणार आहे. तसेच अमावस्या उत्सव होणार नाही. डिसेंबर महिन्यात१३, १४ व १५ तारखेला तर येत्या जानेवारी महिन्यात ११, १२ व १३ असे तीन दिवस मंदिर पूर्णपणे बंद राहील. मंदिर खुले झाल्यानंतर शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच अमित शिरोडकर तसेच इतरांनी श्रीचे दर्शन घेतले.

संबंधित बातम्या