कांदोळकरांना पक्ष स्थापण्याचे स्वतंत्र ः लोबो

अवित बगळी
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

प्रत्येक राजकारण्याला स्वतःच राजकीय पक्ष स्थापन करण्याचा तसेच बोलण्याचे स्वतंत्र आहे. किरण कांदोळकर हे अजून भाजपमध्ये आहेत त्यामुळे ते कोणत्याही मतदारसंघामध्ये जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. जेव्हा ते पक्ष सोडतील व वेळ येईल तेव्हा त्या परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय पक्ष घेईल असे मत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना व्यक्त केले. 

पणजी

काही दिवसांपूर्वी माजी आमदार किरण कांदोळकर यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याने मगोचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार सुदिन ढवळीकर तसेच भाजपचे कार्यकर्ता व माजी केंद्रीयमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली होती यासंदर्भात मंत्री लोबो यांना विचारले असता ते म्हणाले, राजकारणी हे नेते नसून राज्यातील जनता ही नेते आहेत. कारण कोणाची निवड करायची हे जनता ठरवत असते. त्यामुळे राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर लोकांनी स्वीकारले नाही तर त्या पक्षाचा काय उपयोग असा सवाल त्यांनी केला. 
उत्पल पर्रीकर हे भाजपचे कार्यकर्ता आहेत. त्यांच्या वडिलांमुळेच मी भाजपमध्ये आलो. गोव्यातील भाजपच्या प्रगतीमध्ये तसेच सत्ता 
आणण्यामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ते भाजपाविरुद्ध जाण्याचा कधीच निर्णय घेणार नाहीत. कांदोळकर यांच्याबरोबर आठ भाजपचे नेते आहे अशी चर्चा सुरू आहे यासंदर्भात काहीच तथ्य नाही तरीपण हे नेते एकत्रित अगोदर येऊ द्या त्यानंतर योग्य ते उत्तर दिले जाईल. बार्देश तालुक्यातील बहुतेक सर्व मतदारसंघामध्ये माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या संपर्कात मी असतो. जर एखाद्या मतदारसंघाला माझी मदत होईल असे वाटत असल्यास मी ती करण्यास तयार आहे. मतदारसंघांची जबाबदारी ही भाजपची गाभा समिती ठरवत असते. जर या समितीने बार्देश तालुक्यातील मतदारसंघाची जबाबदारी दिल्यास ती मी स्वीकारेन असे ते म्हणाले.

संपादन ः संदीप कांबळे

Goa Goa Goa

संबंधित बातम्या