Kandolkar left the party for selfish reasons: Halarnakar
Kandolkar left the party for selfish reasons: Halarnakar

कांदोळकरांनी स्वार्थांसाठी पक्ष सोडला: हळर्णकर

म्हापसा:  माजी आमदार किरण कांदोळकर यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडला आहे. त्यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासंदर्भात भाजपवर आरोप करू नये. माझ्यावर किंवा माझ्याबरोबर मागच्या 30 वर्षाच्या राजकीय वाटचालीत एकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा कार्यकर्ता नाही, असे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी म्हापसा येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, थिवी भाजपा मंडळ अध्यक्ष विश्‍वनाथ खलप, अस्नोडा पंचायतीच्या माजी सरपंच सपना मापारी, दीक्षा कांदोळकर, दादा कुबल, शरद गाड, समीर चिखलीकर, बाबनी साळगावकर, सलोनी पेडणेकर, पिर्णा सरपंच निता नाईक, तुळशीदास शिंदे, तुळशीदास पालकर, लक्ष्मीकांत परब, उदय वारंग यांची उपस्थिती होती. 

आमदार निळकंठ हर्ळणकर म्हणाले, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे कॉलेज काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकरर्ते होते. त्यांनी नेहमी भाजपाचा प्रचार व प्रसार केला, ते पक्षाच्या धोरणानुसार पक्षाचे काम करीत आहेत. मी मागच्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहे. शिक्षण क्षेत्रात आपले काम आहे. देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी तयार केले जात आहेत. गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान देऊन सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य आपल्या हातून होत आहे. मी गुन्हेगारी समाज घडविला नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किरण कांदोळकर, थिवीची जनता दाखवून देईल, असे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दीपक कळंगुटकर व किरण कांदोळकर यांचा समाचार त्यांनी घेतला. दीपक कळंगुटकर यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करून आत्महत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पक्षाने या व्यक्तीला मोठा स्थान दिले होते. तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पक्ष सोडताना प्रदेशाध्यक्ष तानावडे व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर टीका केली आहे. तसेच पोलिस खात्यावर अपशब्द वापरून आमची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांचा अपमान केल्याबद्दल आपण निषेध करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com