कोलवाळ, शिरसई ‘कांदोळकरां’च्‍या ताब्‍यात

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

अलीकडेच गोवा फॉरवर्डमध्ये दाखल झालेले थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी जिल्हा पंचायतीच्या कोलवाळ व शिरसई अशा दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार करून प्रचारातही आघाडी घेतली होती.

पणजी: अलीकडेच गोवा फॉरवर्डमध्ये दाखल झालेले थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी जिल्हा पंचायतीच्या कोलवाळ व शिरसई अशा दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार करून प्रचारातही आघाडी घेतली होती. त्यांच्यासाठी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत होते. 

कोलवाळमध्ये त्यांनी खुद्द स्वत:ची पत्नी कविता यांना अपक्ष म्हणून उभे करून निवडूनही आणले; तथापि, शिरसईमध्ये त्यांची राजकीय खेळी यशस्वी होऊ शकली नाही. थिवी विधानसभा मतदारसंघ जिल्हा पंचायतीच्या शिवोली, कोलवाळ व शिरसई अशा तिन्ही ठिकाणी विभागला असला तरी सध्या तरी या विधानसभा मतदारसंघावर किरण कांदोळकरांचे प्राबल्य दिसून येते. कारण, कविता कांदोळकर यांनी भाजपपेक्षा सुमारे दोन हजारांचे मताधिक्य मिळवले, तर शिरसईत भाजप उमेदवार दीक्षा कांदोळकर यांनी किरण कांदोळकर पुरस्कृत उमेदवारापेक्षा हजारभर मतांचे मताधिक्य प्राप्त केले.

त्यामुळे, सत्ताधारी भाजपचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्यावर ही एका परीने मातच आहे. आगामी विधानसभेसाठी हळर्णकर यांना जनसंपर्क वाढविण्‍यासाठी पर्याय नाही. त्‍यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कार्यरत राहणे आवश्‍‍यक आहे.

संबंधित बातम्या