काणकोण नगरपालिकेत अनधिकृत नोकरभरतीचा प्रयत्‍न?

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

काणकोण पालिकेत अधिकृत नोकरभरती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पूर्वी घेतलेल्या ठरावावर दुसऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच नोकरभरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्‍याचे नगरसेविका प्रार्थना रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले. नाईक गावकर पालिका मंडळाच्या माजी नगराध्यक्षाही होत्या.

 काणकोण : काणकोण पालिकेत अधिकृत नोकरभरती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पूर्वी घेतलेल्या ठरावावर दुसऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच नोकरभरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्‍याचे नगरसेविका प्रार्थना रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले. नाईक गावकर पालिका मंडळाच्या माजी नगराध्यक्षाही होत्या.

प्राप्त माहितीनुसार पालिकेच्या एक कर्मचारी दोन वर्षाच्या रजेवर जाणार आहेत. त्याच्या जागी रजा काळात नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. तसा ठरावही झाला, मात्र ठराव समंत होऊन त्याची कार्यवाही होण्यासाठी तो ठराव दुसऱ्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळण्याची गरज आहे. मात्र, प्रस्ताव मांडल्यानंतर पालिकेने रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी नवीन नेमणूक करण्याची जाहिरात देऊन घोळ घातला आहे.

त्याला नगरसेविका प्रार्थना नाईक गावकर यांनी आक्षेप घेतला आहे. सर्व सोपस्कार पूर्ण करून कर्मचाऱ्याची नेमणूक करताना पालिका प्रशासनाची मान्यता घेणे गरजेचे आहे. या प्रकरणात सर्व सोपस्कारांना तिलांजली देऊन शॉर्टकट मारण्याचा प्रयत्‍न झाला, हे गैर असल्याचे नाईक गावकर यांचे म्हणणे आहे. या संदर्भात मुख्याधिकारी सतीश प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता ही जागा एक कर्मचारी रजेवर जात असल्याने रिक्त होत आहे. त्याजागी नेमणूक करण्यात येत आहे. मंगळवारी पालिका मंडळाची बैठक बोलाविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या