कर्नाटकच्या 'या' अभिनेत्याचा गोव्यामध्ये अपघात

कन्नड अभिनेता दिगंत मंचले गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर सोमवारी समरसॉल्ट हा क्रीडा प्रकार करताना जखमी झाला आहे.
कर्नाटकच्या 'या' अभिनेत्याचा गोव्यामध्ये अपघात
Diganth Manchale Dainik Gomantak

कन्नड अभिनेता दिगंत मंचले (Diganth Manchale) गोव्यातील (Goa) वागातोर किनाऱ्यावर सोमवारी समरसॉल्ट हा क्रीडा प्रकार करताना जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर बंगलोर येथे त्याला एअर लिफ्ट करण्यात आले. ही घटना सोमवारी वागातोर किनाऱ्यावर घडली आहे. मात्र, याची खबर हणजूण पोलिसात देण्यात आलेली नाहीये. उपलब्ध माहितीनुसार दिगंत मंचले हा आपल्या कुटुंबियांसह गोव्यामध्ये आला होता. (Kannada actor Diganth Manchale has been injured on the Vagator beach in Goa)

Diganth Manchale
गोव्यात केवळ 50 टॅक्सी डिजिटल मीटरविना

समरसॉल्टमुळे दिगंतच्या पाठीला आणि पायालाही दुखापत झाली आहे. त्याची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री अंद्रिता राय हिने दिगंतसोबत त्याच्या उपचारासाठी बेंगळुरूला प्रवास केला. दिगंतची प्रकृती गंभीर असली तरी त्याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दिगंत ट्रॅम्पोलिनवर होता आणि बॅकफ्लिप करण्याचा प्रयत्न करत होता, यावेळी त्याच्या तोल गेल्याने पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की त्याच्या पडण्यामुळे मणक्याचे विघटन झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com