रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी कपिल झवेरीला सशर्त जामीन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

गेल्या १५ ऑगस्टला बंगल्यामध्ये पार्टी आयोजित करून ड्रग्जचा वापर करण्यात आल्याच्या आरोपाखाली क्राईम ब्रँचने त्याला इतर तीन विदेशी महिलांसह अटक केली होती. या प्रकरणाच्या आधारे क्राईम ब्रँचचे पथक या रेव्ह पार्टीचा इतर काही व्यवहाराशी संबंध आहे का याचीही चौकशी सुरू केली आहे.

पणजी: हणजूण रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कपिल झवेरी याला पणजी सत्र न्यायलायाने आज सशर्त जामीन दिला. उद्यापासून पंधरा दिवस क्राईम ब्रँच कार्यालयात तपास अधिकाऱ्यासमोर चौकशीसाठी हजेरी लावण्याची तसेच हणजूण परिसरात पुढील सहा महिने प्रवेश न करण्याची अट घातली आहे. 

न्यायालयाने त्याला जामीन देताना वैयक्तिक ५० हजार रुपयांची हमी तसेच तत्सम रक्कमेचा एक स्थानिक हमीदार देण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्याने भाडेपट्टीवर घेतलेल्या हणजूण येथील फिरंगी पानी बंगल्यामध्ये त्याला जाता येणार नाही. त्याला पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गोवा राज्यातून त्याला बाहेर जाता येणार नाही. 

गेल्या १५ ऑगस्टला बंगल्यामध्ये पार्टी आयोजित करून ड्रग्जचा वापर करण्यात आल्याच्या आरोपाखाली क्राईम ब्रँचने त्याला इतर तीन विदेशी महिलांसह अटक केली होती. या प्रकरणाच्या आधारे क्राईम ब्रँचचे पथक या रेव्ह पार्टीचा इतर काही व्यवहाराशी संबंध आहे का याचीही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात सनबर्न क्लासिक सहआयोजक शैलेश शेट्टी यालाही या रेव्ह पार्टी आयोजित करण्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप ठेवून अटक केली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या