Karmal Ghat : करमल घाट रस्‍ता 6 महिन्‍यांत दुरुस्‍त करणार

काणकोण व्‍हिजन आणि मिशनअंतर्गत पुढील साडेचार वर्षांत काणकोणचा नियोजनबद्ध विकास करण्‍यात येईल, अशी घोषणा सभापती रमेश तवडकर यांनी केली आहे.
Karmal Ghat
Karmal GhatDainik Gomantak

Karmal Ghat : काणकोण व्‍हिजन आणि मिशनअंतर्गत पुढील साडेचार वर्षांत काणकोणचा नियोजनबद्ध विकास करण्‍यात येईल. करमलघाटातील रस्ता असुरक्षित बनला आहे. 13 हजार झाडांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्‍यामुळे गेल्‍या पाच वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. मात्र आता फक्त 350 झाडे कापावी लागतील व त्या बदल्यात दहा हजार नवीन झाडे लावली जाणार आहेत.

यावर सर्वांचे एकमत झाले असून पुढील सहा महिन्यांत या रस्त्याचे चौपदरीकरण काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा स्थानिक आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी केली.

आगोंद येथील रजनी पाईक सभागृहात रविवारी ‘ग्रामस्थांशी संवाद’ या कार्यक्रमात तवडकर मार्गदर्शन करत होते. यावेळी स्थानिक सरपंच फातिमा रॉड्रिगीस, पैंगीण सरपंच सविता तवडकर, उपसरपंच प्रीतल फर्नांडिस, पंचसदस्य करुणा फळदेसाई, जॉन फर्नांडिस, रामनाथ वेळीप, केनिशा फर्नांडिस व अन्य मान्‍यवर उपस्थित होते.

Karmal Ghat
Sonali Phogat Case : सोनालींचा मृत्यू ‘कर्लिस’मध्येच झाला का? चौकशी सुरू

संपूर्ण आशिया खंडात आगोंदचा समुद्रकिनारा द्वितीय स्थानावर असल्यामुळे अन्य राज्यांतून आलेल्या व्यावसायिकांनी गावाच्या विकासासाठी योगदान द्यायला हवे. आपल्याला पाच मोठे प्रकल्प राबवायचे आहेत, असे तवडकर म्‍हणाले.

लवकरच भू-वीजवाहिन्‍या

आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्‍या पुढील तीन महिन्यांत घातल्या जातील. आवश्यक तेथे ट्रान्सफॉर्मर बसविले जातील. त्यामुळे वीजसमस्‍या मार्गी लागेल, असे तवडकर यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com