करमळी, भाटी तलावांना मिळणार; स्वच्छतेच्या कामास लवकरच सुरवात

Karmali Bhati lakes will get Cleaning work to begin soon
Karmali Bhati lakes will get Cleaning work to begin soon


गोवा वेल्हा :  राजधानी पणजी शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या करमळी व भाटी तळे हे पर्यटनदृष्ट्या विकासात्मक क्षेत्र आहे. परंतु सरकारने या तळ्यांकडे पर्यटनदृष्ट्या दुर्लक्ष केल्याने या दोन्ही तळी सध्या प्रदूषित असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने नोंद करून घेतले आहे. त्यांचे शुद्धीकरण आणि स्वच्छता करण्यास सांगितले असून, या दोन्ही तळ्यांचे काम आता लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने नवसंजीवनी मिळणार आहे.


ही दोन्ही तळी राज्यातील प्रसिद्ध तळी आहेत. कोकण रेल्वे स्टेशनसमोर असलेले करमळीचे तळे हे यापैकी एक आहे. सध्या ते अत्यंत दयनीय स्थितीत आहे. पूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना हे तळे म्हणजे एक वरदान ठरले  होते. शेती व्यवसाय हे येथील लोकांचे उपजीविकेचे एकमेव साधन होते. या तळ्याच्या पाण्याचा वापर शेती व्यवसायासाठी होत असे. लोक भातपीकाचे वर्षातून दोनदा काढीत असत. शेती व्यवसाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनीच या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. प्रदूषित पाणी हे त्यापैकी एक आहे. 


या दरम्यान या तळ्याचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सरकारच्या वनखात्याने खास पक्षाचे स्थळ म्हणून घोषित केले होते. कारण विविध प्रकारचे पक्षी येथे आश्रय घेत असतात. अजूनही हे पक्षी आश्रयास येत असून, विदेशी पर्यटक त्यांच्या छायाचित्रणासाठी गर्दी करतात. यात प्रसिद्ध छायाचित्रकार व व्हीडियोग्राफर यांच्या समावेश असतो. इतकेच नव्हे, तर यावर त्यांचा अभ्यास सुरू असतो. पर्यटक येथे खास उपस्थिती लावतात. यामुळे अनेक वाहन चालकांचा यावर उदरनिर्वाह चालतो. येथील दयनीय परिस्थिती पाहून पर्यटकांनी येथे पाठ केली आहे. 


तळे आणि शेत यांच्यामधून रस्ता जो गेलेला आहे. त्याचे दुरुस्तीकरण केले होते. फुटपाथचेही काम केले होते. सध्या हे काम वाहून गेले आहे. रस्ता धोकादायक बनून राहिला आहे. संपूर्ण तळ्याच्या किनारी भागात वृक्षवल्ली वाढलेल्या असून या काही पक्षासाठी घातक असून, काहीचे ते खाद्य आहे. गणेशविसर्जनही करण्यात येते. अधूनमधून मृत जनावरे, घाण आदि अनेक कारणासाठी तळ्याचे पाणी प्रदूषित झालेले आहे.  


या तळ्याची साफसफाई, शुद्धीकरण, स्वच्छता केल्यास राज्यातले एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. तसेच येथे चांगले रोजगारामुख उपक्रम राबविल्यास ते स्थानिक लोकांचे उपजीविकेचेही एक साधन बनू शकते.

भाटीचे तळे महत्त्वाचे...!
तिसवाडी तालुक्यातील हे तळेही गोमंतकात प्रसिद्ध आहे. पिलार, भाटी, गोवा वेल्हा मौळा आदी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले हे तळेही सध्या अत्यंत दयनीय स्थितीत आहे. डोंगराळ भागातून वाहणारे पावसाचे पाणी येथील तळ्यात येऊन मिळते. तळ्यात ते साठविले जाते. वर्षभरात या पाण्याचा वापर पूर्वी अनेक कारणासाठी होई. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. बऱ्याच अंशी शेती व्यवसायही ठप्प झाला असल्यामुळे शेतीसाठी या पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो. या तळ्याचे पाणी गोड असले तरी त्याचा पिण्यासाठी होत नाही. या तळ्यात मात्र चांगल्या माश्यांची पैदास होते. गोडया पाण्यातील गोड मासे म्हणून लोक चवीने खातात. वर्षातून एकदा मासे पैदास होणाऱ्या येथील भागाची साफसफाई होते व मिळलेल्या मासे हातोहात विकले जातात. भाटी तळ्याजवळून गेलेल्या रस्त्याकडील झाडे झुडपे वाढलेली आहेत. रात्रीच्या वेळी सर्पटणा- या प्राण्यांचा धोका संभवतो.येथे काही ठिकाणी उभे असलेले विजेचे खांब धोकादायक वाटतात. संपूर्ण तळे लांब गवताने आच्छादले असल्यामुळे पाण्याऐवजी तळ्यात गवतच अधिक दिसते. उन्हाळ्यात येथील पाण्यात गुरे डूंबून राहून या तळ्याचे शुध्दिकरण व स्वच्छता राखल्यास पर्यटकांचा ओघ अधिक वाढू शकतो. छायाचित्रण व विडिओग्राफीसाठी विदेशी पर्यटक येथे आवर्जून  येतात. आपल्या देशात परतल्यावर येथील चित्रांची डॉक्युमेंटरी तयार करून लाखोंची कमाई करतात. स्थानिक कलाकारांनाही हे सहज शक्य आहे. पण, येथे साफसफाई व स्वच्छता हवी. जेणेकरून हे एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com