बहिणीच्या डोक्यात बॅट मारुन खून करणाऱ्या भावाला कर्नाटकात अटक

 बहिणीच्या डोक्यात बॅट मारुन खून करणाऱ्या भावाला कर्नाटकात अटक
The brother killed his sister by hitting her on the head with a bat

पणजी : भावानेच (Brother) बहिणीचा (Sister) डोक्यात (Head) क्रिकेटची बॅट (Cricket Bat) मारुन खून (killed) केल्याची घटना काल रात्री उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी आरोपीला गदक (कर्नाटक) येथे जाऊन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याची बहीण व आई हे भाडेपट्टीच्या खोलीत राहत होते गेल्या बुधवारी रात्री भावांचे व बहिणीचे पैशाच्या प्रकरणावरून जोरदार कडाक्याचे भांडण झाले आणि या रागाच्या भरात त्याने बहिणीच्या डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली त्यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने बहिणीचा मृतदेह खोलीतच ठेवून दाराला कुलूप लावून गदक येथे पसार झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने आईला आपल्या मूळगावी गदक येथे नेऊन सोडले होते.

तरुणी ज्याच्याकडे कामाला होती तो मालक ती कामाला का आली नाही याची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी आला असता खोलीचे दार बंद असल्याचे आढळून आले व आतून उग्र वास येत असल्याने त्याने पोलिसांना त्याची माहिती दिली. घटनास्थळी घेऊन दाराचे  पोलिसानी कुलूप तोडून आत पाहिले असता तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com