जारकीहोळी सीडी प्रकरण; कर्नाटकातली तरुणी गोव्यात?

जारकीहोळी सीडी प्रकरण; कर्नाटकातली तरुणी गोव्यात?
Karnataka CD case Is the girl in Ramesh Jarkiholi CD case in Goa

पणजी: कर्नाटकच्या राजकारणात गोंधळ उडवून दिलेले सीडी प्रकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी घडवून आणल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनीच त्या तरुणीला काही दिवस आपल्या घरी ठेवले होते, त्यांनतर तिला गोव्याला पाठविले होते, असे त्यांनी म्हटले आहे. 

माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पीडित तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे पहिल्या सीडीत तरुणीने म्हटले होते. यात जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाहोता. 

दररोज या प्रकरणाला वेगळे वळण लागत आहे. शुक्रवारी तिच्या कुटुंबीयांनी बंगळूर येथील कब्बनपार्क पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिचे वडील आणि भाऊ यांनी शिवकुमार यांच्या सूचनेवरून सीडी प्रदर्शित झाल्या. तिचा कुणाशी संपर्क होऊ नये यासाठी तिला गोव्यातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता विशेष तपास पथकाने गोव्यात तपास करण्याची तयारी चालविली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com