‘केसीआयसी’कडे ३७ किनाऱ्यांची जबाबदारी

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पर्यटन विभाग गोवा सरकारने कर्नाटक वाणिज्‍यिक व औद्योगिक कॉपोरेशन (केसीआयसी) प्रा. लि. बंगळुरु यांना समुद्रकिनारे साफसफाईचे कंत्राट दिले आहे. उत्तर गोव्यातील १६ प्रमुख किनारे आणि दक्षिण गोव्याचे २१ मोठे किनारे यांच्‍या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. 

पणजी: पर्यटन विभाग गोवा सरकारने कर्नाटक वाणिज्‍यिक व औद्योगिक कॉपोरेशन (केसीआयसी) प्रा. लि. बंगळुरु यांना समुद्रकिनारे साफसफाईचे कंत्राट दिले आहे. उत्तर गोव्यातील १६ प्रमुख किनारे आणि दक्षिण गोव्याचे २१ मोठे किनारे यांच्‍या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. 

किनारे साफसफाईचे कंत्राट मिळालेल्‍या कर्नाटकस्‍थित कंपनीचे शाखा कार्यालय गेरा एम्‍पोरियम इमारत दोनच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर आहे. 

समुद्र किनाऱ्यावरून दररोज कचरा गोळा केला जातो. गोळा केलेला कचऱ्याची कर्मचाऱ्यांकडून वर्गवारी केली जाते. ओला व सुका अशी विभागणी केली जाते. एकदा कचरा वेगळा केला की तो कलर कोड कचरा पिशवीत भरला जातो आणि अंतिम विल्हेवाट लावण्यासाठी साळगाव येथील गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे वाहतुकीसाठी वाहनात भरला जातो. पर्यटन कालावधीत पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्समधूनही कचरा गोळा 
जातो. 

करार झाल्‍यानंतर गोळा केलेला कचरा

  • ५ लाख १७ हजार १६० किलो कोरडा कचरा
  • ४ लाख १९ हजार ९५० किलो ओला कचरा 
  • ३ लाख ९५ हजार १७० किलो वृक्ष कचरा.

संबंधित बातम्या