कारवार रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, 2 कोटी रुपयासह आरोपीला घेतले ताब्यात

कोकण रेल्वेच्या मुंबई- मंगळूर रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या चेन सिंग याला कारवार रेल्वे पोलिसांनी 2 कोटी रुपयासह आरोपीला ताब्यात घेतले.
कारवार रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, 2 कोटी रुपयासह आरोपीला घेतले ताब्यात
Karwar Railway Police Dainik Gomantak

कोकण रेल्वेच्या मुंबई- मंगळूर रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या चेन सिंग याला कारवार रेल्वे पोलिसांनी 2 कोटी रुपयासह ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. सिंग हा मूळचा राजस्थानचा असून तो विना तिकीट प्रवास करत असल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला हटकले आणि बॅग उघडण्यास सांगितले. मात्र बॅग उघडण्यास त्याने नकार दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. क्राईम ब्रॅंचच्या पोलिसांच्या मदतीने बॅग उघडली तर त्यात चक्क 2 कोटी रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. (Karwar Konkan Railway Police arrested the accused along with Rs 2 crore)

Karwar Railway Police
फातोर्डा कदंब बस स्थानकावर एकाचा मृत्यू

दरम्यान, ही रोकड मुंबई येथील भारत भाई उर्फ पिंटू यांची असून ती मंगळूर येथील राजू नामक व्यक्तीला देण्यासाठी नेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या बदल्यात मला 15 हजार रुपये कमिशन मिळत असल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. या संदर्भात रेल्वे पोलिस निरीक्षक विपीन सिंग राणा यांनी आयकर विभागाला कळविले असून सिंग याला कारवार ग्रामीण पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com