सुरण सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात...

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

 पावसाने परतीचा मार्ग धरल्याने आता डिचोलीत राज्याबाहेरुन काटेकणगा, माडयो, सुरण आदी कंदमुळांची आवक होवू लागली आहे. पुढील आठवड्यापर्यंत ही आवक वाढण्याची शक्‍यता आहे. यावर्षी माडयो आणि अन्य कंदमुळांचे दर सामान्य जनतेला परवडण्यासारखे आहेत.

डिचोली: पावसाने परतीचा मार्ग धरल्याने आता डिचोलीत राज्याबाहेरुन काटेकणगा, माडयो, सुरण आदी कंदमुळांची आवक होवू लागली आहे. पुढील आठवड्यापर्यंत ही आवक वाढण्याची शक्‍यता आहे. यावर्षी माडयो आणि अन्य कंदमुळांचे दर सामान्य जनतेला परवडण्यासारखे आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंदमुळांचा भाव सध्या तरी समाधानकारक असल्याचे जाणवत आहे. डिचोली बाजारात जेमतेम प्रमाणात स्थानिक कंदमुळे विक्रीस उपलब्ध असतात. तर मागील काही वर्षापासून राज्याबाहेरील कंदमुळांची डिचोली बाजारपेठेत आवक होत आहे.

चोर्ला घाट तसेच कर्नाटकातील जांबोटी भागातून बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी मोठया प्रमाणात काटेकणगा, माडयो, सुरण आदी कंदमुळांची आवक होत असते. येथील सार्वजनिक गणपती पूजन मंडपात या कंदमुळांचा खास बाजार भरतो. महिला आणि पुरुष जवळपास पन्नास विक्रेते आपला व्यवसाय करतात. ही कंदमुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकही याठिकाणी खास भेट देतात. त्यामुळे हा बाजार गजबजलेला असतो. यावर्षी पावसामुळे कंदमुळांचे पिक लांबले असले, तरी काटेकणगा, माडयो, सुरण आदी कंदमुळांचे पीक समाधानकारक आले आहे. पौष्टीक जीवनसत्वामुळे काटेकणगां आदी कंदमुळांना वाढती मागणी असल्याने त्यांना तेजी असते.

माडयो आकाराप्रमाणे ५० ते १५० रुपये नग, सुरण १०० ते २०० रुपये नग, काराणे ५० ते १०० रुपये वाटा या दराने विक्री करण्यात येत आहेत. तर काटेकणगा आकाराप्रमाणे ३०० ते ५०० रुपये १०० नग, तर ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. एकदम लहान आकाराच्या काटेकणगा १०० रुपये वाटा या दराने मिळत आहेत. गोव्याबाहेरुन येणारी कंदमुळे घाऊक दराने खरेदी करण्यासाठी बाजारातील स्थानिक विक्रेतेही झुंबड करतात. काही विक्रेत्या तर हीच कंदमुळे गावठी असल्याचे भासवून ज्यदा दराने विक्री करतात. ग्राहकांनाही याची कल्पना असल्याने, त्यांचाही खास बाजारातील कंदमुळे खरेदी करण्यावर भर असतो. तेसुध्दा एकदमच कंदमुळांची विक्री करताना आढळून 
येतात.

संबंधित बातम्या