अटल सेतू वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवा : रोहन खंवटे

अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री करणार पाहणी
Atal setu
Atal setu Dainik Gomantak

पणजी : अटल सेतू पुलावर वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता काही दिवस अटल सेतू बंद ठेवावा, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने पुलाची पाहणी करणार असल्याची माहिती दिली. (Keep Atal Setu closed for few days for transportation says Rohan Khaunte goa)

Atal setu
कुर्टी परिसरात मगरींचा बिनधास्त वावर

अटल सेतूवर वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता, सध्या पर्यटकांची संख्या आणि रहदारीही कमी असल्याने अटल सेतू काही दिवस बंद ठेवावा आणि तज्ज्ञांमार्फत या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करावी. तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करून पुन्हा अटल सेतू सुरू करावा, असे मत मंत्री खंवटे यांनी व्यक्त केला आहे. यावर आपण स्वतः लवकरच अटल सेतूची पाहणी करणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

Atal setu
विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश

अटल सेतूचे बांधकाम गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या वतीने केले असून अटल सेतूवरून फोंड्याकडे जाणाऱ्या वन-वेवर सातत्याने अपघात होत आहेत. यासाठी मद्रास ‘आयआयटी’कडून या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

सध्या या प्रकल्पाची देखरेख संबंधित कंत्राटदाराकडेच आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांच्या कार्यकाळात चाचणी घेऊनच हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी या प्रकल्पामध्ये दोष असल्यास हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम खात्याकडे घेणार नसल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com