केपे पालिकेवर पुन्हा एकदा बाबू कवळेकरांचे वर्चस्व

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

केपे पालिकेवर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री व केप्याचे आमदार बाबू कवळेकर यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

मडगाव: केपे पालिकेवर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री व केप्याचे आमदार बाबू कवळेकर यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 13 प्रभागांपैकी आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या 8 प्रभागांतून कवळेकर समर्थक उमेदवार निवडून आले आहेत.प्रभाग 1 मध्ये चेनत हळदणकर, प्रभाग 2 गोपाळ मोडक, प्रभाग 3 सुचिता शिरवईकर, प्रभाग 4 प्रसाद फळदेसाई, प्रभाग 5 फिलू डिकाॅस्ता, प्रभाग 6 दिपाली नाईक, प्रभाग 7 दयेश नाईक व प्रभाग 8 अमोल काणेकर हे निवडून आले आहेत. (Kepe is once again in the possession of Babu Kavalekar) 

संबंधित बातम्या