Illegal Boating: ‘ती’ बोट गोव्‍याच्‍या हद्दीत आलीच कशी?

अरबी समुद्रात मागील पाच दिवसांपूर्वी केरळची बुडालेली पर्यटक बोट गोव्‍याच्‍या हद्दीत आलीच कशी? हा प्रश्न अनेकांना पडतो आहे.
Boat|Illegal Boating
Boat|Illegal BoatingDainik Gomantak

Illegal Boating: अरबी समुद्रात मागील पाच दिवसांपूर्वी केरळची बुडालेली पर्यटक बोट ‘एम. व्ही.स्वाफिश’ बाहेर काढणार कोण? जर ही बोट केरळमध्ये नोंदीत आहे, मग ती गोव्याच्या हद्दीत आली कशी, तिला कोणी आणले?

त्या बोटीला विनापरवाना पणजीतील तरंगत्या जेटीजवळ उभी करण्यास परवानगी दिली होती का? जेटीवर नांगरण्यासाठी लागणारे शुल्क बंदर कप्तान खात्याने स्वीकारले होते का? हे सर्व प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत.

भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी काल शुक्रवारी सकाळी लक्षवेधी सूचनांच्या वेळी विधानसभेत बेकायदेशीर जलक्रीडा प्रकारांवर आळा घालण्याचा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना घेऊन आलेली एक बोट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख केला.

Boat|Illegal Boating
Coal Transportation: 'कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करा'

त्यावर उत्तर देताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बंदर कप्तान खात्यातील अधिकाऱ्याचा बुडालेल्या बोटीशी संबंध असल्याची माहिती हाती आल्याचे सांगितले होते. विशेष बाब म्हणजे बोट बुडाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ आता सामायिक होऊ लागले आहेत.

ती बोट गोव्यात बंदर कप्तान खात्याकडे नोंद करून आली असले तर तिला परवानगी कशी दिली? त्या बोटीची बांधणी कोणी तपासली? असा सवाल उपस्थित होत आहेत. ज्या परिसरात समुद्रात बोट बुडाली आहे. त्‍याठिकाणी न जाण्याच्या सूचना नाविकांना देणारे पत्रक बंदर कप्तान खात्याने काढलेले आहे.

Boat|Illegal Boating
Goa News: ‘ती’ गहाळ फाईल शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर

बोट पाण्‍याबाहेर काढणे खर्चिक

समुद्रात बुडालेली बोट बाहेर काढायची झाल्यास बंदर कप्तान खात्याने बोटमालकास बोलावावे लागणार आहे. बोट काढायची झाल्यास संबंधित मालकाने ती बाहेर काढायची असते, असा नियम आहे. ज्यावेळी ‘लकी सेव्हन’ हे जहाज मिरामार किनाऱ्यावर अडकले होते,

तेव्हा संबंधित मालकाला ते काढून न्यावे लागले होते. ही बुडालेली बोट बाहेर काढायची झाल्यास ते खर्चिक आहे आणि ती बोट जास्त काळ पाण्याखाली राहिल्यास त्यातील इंधन पाण्यात मिसळू शकते, अशी भीतीही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com